रक्षाबंधन-सुरक्षाबंधन सोहळा उत्साहात
By admin | Published: August 20, 2016 12:26 AM2016-08-20T00:26:43+5:302016-08-20T00:26:43+5:30
रक्षाबंधनाचे औचित्य साधून भंडारा पोलीस वाहतूक नियंत्रण शाखा, क्रिएटिव्ह ग्रुप भंडारा यांनी काल, गुरुवार रोजी ...
वाहतूक नियमांचे धडे: पोलीस वाहतूक नियंत्रण शाखा, क्रिएटिव्ह ग्रुपचा उपक्रम
भंडारा : रक्षाबंधनाचे औचित्य साधून भंडारा पोलीस वाहतूक नियंत्रण शाखा, क्रिएटिव्ह ग्रुप भंडारा यांनी काल, गुरुवार रोजी त्रिमुर्ती चौक येथे रक्षाबंधन - सुरक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन केले.
बहिण भावाला रक्षाबंधनाच्या वेळी राखी बांधून ओवाळणीमध्ये तिच्या सुरक्षीततेकरिता बहिणीला सुरक्षेचे वचन देतो. त्याचप्रमाणे वाहतूक पोलीस आपणास राखी बांधून आपणाकडून वाहतुकीचे नियम समजावुन सुरक्षेची हमी देतो. पोलिसांनी चालकांना राखी बांधुन त्यावेळी घेवुन येणारे जाणारे वाहन चालकांना राखी बांधुन वाहतुकीचे नियम समजावुन सांगितले. अपघातापासुन जनतेचे संरक्षण करण्याचे बंधन मागणे अशी या कार्यक्रमाची संकल्पना होती.
कार्यक्रमाला पोलीस अधिक्षक विनीता साहू प्रमुख्याने उपस्थित होत्या. रस्ते अपघातामध्ये हजारो नागरिकांचा मृत्यू होत असल्याची खंत व्यक्त केली. हा धागा केवळ नात्याचा किंवा प्रेमाचा नसून नात्याच्या पलिकडे जावुन एक अस्वस्त, शास्वत, अभयदान, अक्षय दान, आज आम्ही ओवाळणीत मागत आहोत. वाहतूक नियमांचे बंधनाविषयी चिंतन सर्वांच्या आयुष्याला बळकटी देईल. असे प्रवाशांना सांगण्यात आले.वाहन वापरतांना वाहनाचे वेगावर नियंत्रण, मद्यप्राशन करुन वाहन चालविणार नाही, दुचाकीवर हेल्मेटचा वापर करावा इत्यादी वाहतुकीच्या नियमांना समजुन घेईल व पालन करणार, असे क्रिएटीव्ह ग्रुप यांनी अपघात घडण्याची वेगवेगळी कारणे विषद करणारी नाटीका सादर केली. पोलीस विभागातील महिला पोलिसांनी चालकांना राखी बांधून वाहतूक नियमाबाबत घोषवाक्य असलेली पत्रके वाटण्यात आली. कार्यक्रमाला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी निमजे, पोलीस उपधिक्षक धूसर, पोलीस निरीक्षक कोलवाडकर, खंडारे, लोळे, हवालदार कठाणे, कळमकर, शिपाई हुमणे, निरज साबळे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक पोलीस निरीक्षक राऊत, संचालन क्रिएटीव्ह ग्रुपच्या स्मिता गालफाडे यांनी केले. आभार प्रदर्शन क्रिएटिव्ह ग्रुपचे ठवकर यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)