बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक रक्षाबंधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:38 AM2021-08-22T04:38:00+5:302021-08-22T04:38:00+5:30

पालांदूर : जगाच्या पाठीवर भारतीय संस्कृतीच्या संस्कारांना तोड नाही. ते मौलिक आहेत. जीवन जगण्याला गोडी निर्माण करण्याची ताकद भारतीय ...

Rakshabandhan is a symbol of brother-sister love | बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक रक्षाबंधन

बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक रक्षाबंधन

googlenewsNext

पालांदूर : जगाच्या पाठीवर भारतीय संस्कृतीच्या संस्कारांना तोड नाही. ते मौलिक आहेत. जीवन जगण्याला गोडी निर्माण करण्याची ताकद भारतीय समाजमनात रुजली आहे. प्रत्येक नात्याच्या वळणावर नैतिकतेचे मापदंड असून, बहीण-भावाच्या नात्यालाही शिरपेचात मान आहे. रक्षाबंधन अर्थात नारळी पौर्णिमा उत्साहात पार पडत आहे. कोरोना संकटातही रक्षाबंधनानिमित्त राख्यांची दुकाने सजली असून, मिठाईच्या दुकानांत गर्दी दिसत आहे.

श्रावण महिन्यात नागपंचमीनंतर येणारा महत्त्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन. श्रावण पौर्णिमेच्या शुभ पर्वावर या सणाला विशेष महत्त्व असते. बहीण-भावाच्या अतूट नात्याचा आलेख म्हणजेच रक्षाबंधन. आजच्या विज्ञान युगातही तरुण- तरुणी कॉलेज जीवनात मोठ्या आदराने रक्षाबंधनाचा सण निभावत भाऊ-बहिणीचे नाते अभंग करीत आहेत. जातीपातीच्या संपूर्ण मर्यादा ओलांडून रक्षाबंधन उत्सव पार पाडला जातो. रक्ताच्या नात्यापेक्षाही मानलेली नाती मोठी ठरतात. ही नाती टिकवण्याची किमया भारतीय संस्कृतीच्या रक्षाबंधन उत्सवात कायम आहे.

‘भैया मेरे राखी के बंधन को निभाना’ या गाण्याने बहिणीच्या आर्त हाकेने भावाचे मन हेलावून जाते. कितीही अडचणी व संकटे असली तरी बहीण भावाच्या किंवा भाऊ बहिणीच्या घरी रक्षाबंधनाला नक्की जातो. रक्षाबंधनाच्या अतूट धाग्याने बहीण-भावाचे नाते चिरकाल टिकते. भाऊ बहिणीच्या रक्षणाकरिता सदैव तत्पर असतो. आपल्या सुखातील सुख वाटून त्याला गोडवा प्राप्त करून देतो. याच नात्याची किमया टिकून आज आई-वडिलांच्या संपत्तीत बहीण-भावाचा समान हिस्सा असूनही बहीण हिस्सा नाकारत केवळ रक्षाबंधन निभवण्याचे वचन मागते. सासरी बहिणीला कितीही सासुरवास असला तरी ती ओठावर येऊ देत नाही. माहेराला निरोप पाठविताना म्हणते ‘रुणझुण पाखरा जा माझ्या माहेरा माझ्या भावाला सांगशील माझा निरोप बरा’ असा हा बहीण-भावाचा सण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधनाचे रूप बदलू शकते. मात्र, भाव कायम असते. गरीब श्रीमंतीची दुरी न पाहता लहान- मोठ्यांचा भाव न ठेवणारा केवळ प्रेम म्हणजे प्रेम याच नात्याने रक्षाबंधन निभावले जात आहे.

बाजारात आठवडाभरापासून राख्यांची दुकाने सजलेली आहेत. फेसबुक, व्हाॅटस्ॲपच्या दुनियेत प्रेमाच्या धाग्याचा महिमा थोर आहे. पैशापासून ते रुपयापर्यंत किमतीत असणाऱ्या राख्या बहीण- भावाला समानच आहेत. ज्या भावाला बहीण नाही तो आज खिन्न मनाने ओठावर दुःख येऊ न देता बहिणीसाठी झुरतो आहे. देवाला साकडे घालत मला पुढच्या जन्मी बहीण मिळू दे! अशी मनोमन कामना करतो आहे.

धार्मिक क्षेत्रातही या उत्सवाला मोठी कीर्ती आहे. भक्तगण महादेवाला राखी बांधण्याकरिता आपापल्या शेजारच्या शिवमंदिरात जात आहेत. पालांदूरशेजारील किटाळी व गोंदिया जिल्ह्यातील प्रतापगड येथे भक्तगण राखी उत्सवाला हजेरी लावण्याची प्रथा आजही कायम आहे.

बॉक्स

राख्यांची किंमत वाढली

बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधनानिमित्त शहरासह ग्रामीण भागातील राखीच्या बाजारपेठा सजल्या आहेत. बहिणींनी आपल्या लाडक्या भावासाठी विशेष राख्या खरेदी केलेल्या आहेत. यावर्षी राख्यांची किंमत वाढलेली असून, विविधांगी राख्या सर्वांच्याच आकर्षणाचा विषय ठरला आहे.

Web Title: Rakshabandhan is a symbol of brother-sister love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.