पालांदुरात भजनाच्या तालात नंदीसह गावफेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 12:16 AM2019-09-01T00:16:18+5:302019-09-01T00:17:08+5:30

पूर्वीचा बापू महाजनांचा वाडा आता देवराम महाराजांचा वाडा या नावाने ओळखला जात आहे. वाड्यात कुणाला सहजतेने प्रेम, माया मिळते. वर्षभर आपुलकीने जगत गुण्यागोविंदाने नांदणारा हा वाडा तान्हा पोळ्याच्या निमित्ताने गावात वडीलोपार्जीत नंदी भजनांच्या साक्षीने फेरी घालतो.

The Rally the Nandi with bhajan in Palandur | पालांदुरात भजनाच्या तालात नंदीसह गावफेरी

पालांदुरात भजनाच्या तालात नंदीसह गावफेरी

Next

मुखरु बागडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : संस्कृती जपावी ती भारतीयांनी म्हणतात ते खरंच आहे. जग कितीही बदलेल. मात्र आम्ही पारंपारिकतेचे पाईक आहोत. हे पोळा सणाला जगाला कळते. पोळ्याचा दुसरा दिवस म्हणजे तान्हा पोळा. या दिवशी परंपरेने आजही तान्हा पोळ्याला देवराम महाजनांच्या वाड्यातील चार फुट उंचीचा नंदी अख्खा गावाला भजनांच्या संगतीने दहीकाला वाटत सहिष्णूता जपतो आहे.
पूर्वीचा बापू महाजनांचा वाडा आता देवराम महाराजांचा वाडा या नावाने ओळखला जात आहे. वाड्यात कुणाला सहजतेने प्रेम, माया मिळते. वर्षभर आपुलकीने जगत गुण्यागोविंदाने नांदणारा हा वाडा तान्हा पोळ्याच्या निमित्ताने गावात वडीलोपार्जीत नंदी भजनांच्या साक्षीने फेरी घालतो. गावात सर्वात मोठा नंदी असून फार पूर्वी लाखांदूर तालुक्यातील चप्राड इथून १० कुडव धानाने खरेदी केला होता. अत्यंत सुरेख देखणा नंदी सर्वांना भुरळ न पाडेल तर नवलच. नंदीच्या गावफेरीला गावकऱ्यांची मोठी गर्दी असते.
अखंड परंपरा महिलांचा, पुरुषांचा संगीतमय भजन सर्वांना मंत्रमुग्ध करतो. नंदीला सप्रेम नमस्कार करीत गावकरी नंदीसोबत पुढे पुढे चालतात. असा अविस्मरणीय सोहळा सर्वांच्याच नजरेचे पारणे फेडतो. पालांदुरला वेगळेपणा जपण्यास या वाड्यातील नंदीचे मोलाचे स्थान आजही टिकून आहे. आजोबांची अखंड परंपरा आजही टिकून आहे. वाड्यातील लहान मोठे सर्व सदस्य सहकार्य करीत असल्याने कार्य सिद्धीला जाते. गावकरीही सहभाग देत असल्याने उत्साह टिकून आहे.

Web Title: The Rally the Nandi with bhajan in Palandur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.