भाकपचा विविध मागण्यांसाठी मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 09:50 PM2018-12-07T21:50:33+5:302018-12-07T21:50:49+5:30
भारतीय कम्युनिस्ट पक्ष व डाव्या पक्षाच्या ‘संविधान बचाव व धर्मनिरपेक्षता दिन आणि महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियनच्या राज्यव्यापी ग्रामपंचायत स्तरीय आंदोलनाचा समापन’ यानिमित्ताने गुरुवारला भाकप कार्यालय साकोली येथून मोर्चा काढण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : भारतीय कम्युनिस्ट पक्ष व डाव्या पक्षाच्या ‘संविधान बचाव व धर्मनिरपेक्षता दिन आणि महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियनच्या राज्यव्यापी ग्रामपंचायत स्तरीय आंदोलनाचा समापन’ यानिमित्ताने गुरुवारला भाकप कार्यालय साकोली येथून मोर्चा काढण्यात आला.
‘संविधान बचाव, देश बचाव धर्मनिरपेक्षता दिन जिंदाबाद’ आदी घोषणा देत मोर्चा तहसिल कार्यालयावर पोहचल्यावर मोर्च्याचे रुपांतर धरणे आंदोलनात करण्यात आले. मोर्चाचे नेतृत्व शिवकुमार गणविर, शांताराम शेंडे, राजु बडोले, दिलीप उंदिरवाडे किशोर बारस्कर, केशव भेंडारकर, झाडु वासनीक, बाबुराव मेश्राम, शैलेश गणविर यांनी केले. धरणे आंदोलनासमोर नेत्यांनी मार्गदर्शन केल्यानंतर एका शिष्टमंडळाद्वारे तहसीलदार अरविंद हिंगे यांना मागण्यांचे निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.
निवेदनात, रोजगार हमी कायद्यांर्गत नमुना ४० चे अर्ज उपलब्ध करुन देणे, सर्व गरजुंना घरकुल देणे, प्रति रेशन कार्ड ३५ किलो रेशन, केरोसिन, साखर व इतर जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणे, श्रावण बाळ, संजय निराधार योजनेचे अर्थसहाय्य दरमहा एक हजार रुपये व वयोमर्यादा ६० वर्ष करावी, उज्वला योजनेला सबसिडी द्यावी, वनाधिकार कायद्यांतर्गत विनाअट पट्टे देण्यांत यावे, साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयाची दुर्दशा सुधारावी, राष्ट्रीय महामार्ग व इतर मार्गावरील गतिरोधकांवर काळे पांढरे संकेत पट्टे करावे, साकोली नगर परिषदेचे उपाध्यक्षांच्या तिसरे अपत्याची हेतुपुर्वक नोंद केली नसल्याप्रकरणी उपाध्यक्ष व नगर परिषद अधिकाऱ्यांविरुध्द कारवाई करावी, आलेबेदर येथील काबिलकास्त जमीनी मुळ लाभार्थ्यांच्या ताब्यात द्यावी, नागझीरा रोडवरील भूखंड पाडुन विक्री होत असलेली काबिलकास्त जमीन सरकारजमा करुन सरकारी ताबा करावा, साकोली नगरीत मंजुर विकास कामे सुरु करावी, कृषीपंपाचे विनारिडींग बिल देऊ नये, रेतीअभावी बांधकाम बंद असल्यामुळे बांधकाम कामगारांवर उपासमारी आली तेव्हा रेतीघाट सुरु करावे आदी मागण्यांचा समावेश होता.
मागण्यांबद्दल आठवडाभरात कारवाई करण्याचे आश्वासन तहसीलदार यांनी दिले. मोर्चामध्ये जिल्ह्यातील भाकपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.