पालकसभेला उसळली गर्दी; जागरुकतेवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 01:25 AM2017-07-22T01:25:51+5:302017-07-22T01:25:51+5:30

शाळेतील सभा म्हटले की ओढूनताणून बोटावर मोजण्याइतकी पालकांची उपस्थिती राहते.

The rallying rally; Awareness Fills | पालकसभेला उसळली गर्दी; जागरुकतेवर भर

पालकसभेला उसळली गर्दी; जागरुकतेवर भर

Next

खराशी येथील जि.प.शाळा : १४७ विद्यार्थी व १८० पालकांची उपस्थिती
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शाळेतील सभा म्हटले की ओढूनताणून बोटावर मोजण्याइतकी पालकांची उपस्थिती राहते. मात्र या परिस्थितीला अपवाद ठरते लाखनी तालुक्यातील जिल्हा परिषद खराशीची शाळा या शाळेत १४७ विद्यार्थी संख्या असतानाही १८० पालकांनी उपस्थिती लावून पालक सभेचे महत्त्व जाणले.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राची अंमलबजावणी राज्यातील सर्वच शाळांमध्ये सुरू आहे. मात्र या प्रगतीचा उदयच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खराशी शाळेतून झाला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, अशी शैक्षणिक प्रगती या शाळेच्या शिक्षकांनी घडवून आणली आहे.
शाळा म्हटले की, विद्यार्थी घडविणे हा महत्त्वाचा मुद्दा. यासोबतच पालकांचीही जागरुकता गरजेची असते. एरवी अनेक शाळांमध्ये पालक सभेला पालकांची उपस्थिती नगण्य असते. मात्र खराशी जिल्हा परिषदेची शाळा याला अपवाद ठरली आहे.
शैक्षणिक सत्र नुकतेच सुरू झाले आहे. त्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक मुबारक सैयद यांनी पालकांची पहिलीच सभा बोलाविली. शाळेत १४७ विद्यार्थी संख्या आहे. त्यामुळे १४७ पालकांची उपस्थिती गरजेची होती. मात्र ही उपस्थिती संख्या १८० वर पोहोचल्याने छोट्याशा खराशी गावातील पालक त्यांच्या मुलाच्या शिक्षणाबद्दल किती जागरूक आहे यावरूनच दिसून येते.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष थालिराम बावने, सदस्य रत्नाकर नागलवाडे, ताराचंद जगनाडे, सुलभा मेश्राम, ललीता सेलोकर, दुधराम झलके, सूर्यवंशी यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी पालकांचे समुपदेशन करण्यात आले.
या सभेत नवीन पालकांचे स्वागत करण्यात आले, विद्यार्थी बँकेची चर्चा व मार्गदर्शन, शालेय साहित्याची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन, विद्यार्थ्यांचा गृहपाठ करून घेण्याबाबत जागरूकता, पालकांच्या शंकांचे समाधान आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत पालकांना जागरूक करण्यात आले. या सभेला शाळेचे शिक्षक जयंतकुमार खंडाईत, राम चाचेरे, दुर्गा टेकाम, तारा कांबळे, अमोल बावणे, बेबी आठवले आदींची उपस्थिती होती.

Web Title: The rallying rally; Awareness Fills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.