माजी सभापती कलाम शेख यांचा भाजपला रामराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 10:36 PM2018-01-12T22:36:25+5:302018-01-12T22:36:52+5:30

पंचायत समिती तुमसरचे माजी सभापती तसेच अल्पसंख्याक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष व २५ वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समर्थक कलाम शेख यांनी ......

Ram Rama to BJP's former speaker Kalam Sheikh | माजी सभापती कलाम शेख यांचा भाजपला रामराम

माजी सभापती कलाम शेख यांचा भाजपला रामराम

Next
ठळक मुद्देभाजपला हादरा

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : पंचायत समिती तुमसरचे माजी सभापती तसेच अल्पसंख्याक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष व २५ वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समर्थक कलाम शेख यांनी गुरुवारला भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पाठवून भाजपला हादरा दिला आहे.
कलाम शेख अल्पसंख्यक असतानाही पक्षाबाबत असलेली निष्ठा ही त्यांच्या जमेची बाजु होती. त्यामुळे पक्षाने वेळोवेळी दिलेली जबाबदारी त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडली. मात्र पक्ष सत्तेत आल्यानंतर निष्ठावानाची कदर होत नव्हती.
दुसºया पक्षातून प्रवेश करणारे इथे निष्ठेची भाषा करु लागले होते. त्याचबरोबर भाजपात हुकूमशाही सुरु झाल्यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये खदखद निर्माण झाल्यानेच आपण राजीनामा देत असल्याचे शेख यांनी सांगितले. अन्य पक्षात प्रवेश न करता बहुजनांच्या चळवळीत सक्रिय राहणार असल्याचे कलाम शेख यांनी स्पष्ट केले आहे.
पक्षातून निष्काषित
भाजपा जनता पार्टीचे कार्यकर्ते कलाम शेख, सिहोरा तसेच पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपूरे व दर्शन भोंदे यांनी पक्ष विरोधी कारवाइर केल्यामुळे तिघांना भाजप मधुन निष्काषित केल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष तारीक कुरैशी यांनी कळविले.

Web Title: Ram Rama to BJP's former speaker Kalam Sheikh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.