वैनगंगेचा बोंडराणी रामघाट भाविकांनी दुमदुमला
By Admin | Published: November 17, 2016 12:46 AM2016-11-17T00:46:07+5:302016-11-17T00:46:07+5:30
तिरोडा तालुक्याच्या शेवटच्या टोकावर वैनगंगेचे रामघाट-बोंडरानी, अर्जुनी मध्य प्रदेशला लागून असलेल्या निसर्गरम्य वन विभागाच्या जंगलात आहे.
कार्तिकी एकादशी : हजारोंनी घेतले राम, विठ्ठल व शंकराचे दर्शन
परसवाडा : तिरोडा तालुक्याच्या शेवटच्या टोकावर वैनगंगेचे रामघाट-बोंडरानी, अर्जुनी मध्य प्रदेशला लागून असलेल्या निसर्गरम्य वन विभागाच्या जंगलात आहे. वैनगंगेतून स्नान करून श्री रामचंद्र, विठ्ठल, शंकराचा एकच ध्यास मनी ठेवून आलेल्या हजारो भाविकांनी सोमवारी कार्तिकी एकादशी पौर्णिमेच्या कडाक्याच्या थंडीतही दर्शन घेतले.
या ठिकाणी दरवर्षी भव्य जागरण केले जाते. यावर्षी श्वेता तिवारी यांच्या चमुसह जागरण करण्यात आले. यात झाकीने नागरिकांचे मन मोहून घेतले. देवी काली, शिवशंकर, साईबाबा यांचे भाविकांनी दर्शन घेतले. या ठिकाणी मध्य प्रदेशच्जा बालाघाट जिल्ह्यातून व तिरोडा, गोंदिया, तुमसर या ठिकाणांहून भाविक मोठ्या प्रमाणात येतात. कार्यक्रमाचे आयोजन अर्जुनी गावच्या परिसरातील भाविक नागरिकांकडून केले जाते. पोलीस पाटील डॉ. कुंजीलाल भगत, टेकचंद अग्रवाल, प्रीतम रहांगडाले, शालीकराम साकुरे, महेंद्र कांबळे, प्रकाश अग्रवाल, चतुर्भूज बिसेन, निलकंठ साकुरे, अजय चावडा व सर्व कमिटीचे सदस्य सहकार्य करतात. या वेळी सर्व भाविकांनी पथनाट्याचा आनंद घेतला.
दवनीवाडाचे ठाणेदार डब्ल्यु.एच. हेमने यांच्या मार्गदर्शनात देव सहायुनी, मरस्कोल्हे, कोकाडे, पारधी, महिला पोलीस हेड कॉन्स्टेंबल पटले, पारधी बंदोबस्तासाठी आपल्या चमूसह तैनात होते. (वार्ताहर)