कोरंभी येथे रमाई जयंती उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:40 AM2021-02-20T05:40:32+5:302021-02-20T05:40:32+5:30
माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सोहळ्याचे उद्घाटन आदिवासी प्रकल्पाचे वित्तीय उपायुक्त विलास कावळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहउद्घाटक ...
माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सोहळ्याचे उद्घाटन आदिवासी प्रकल्पाचे वित्तीय उपायुक्त विलास कावळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहउद्घाटक म्हणून माजी न्यायाधीश तथा सामाजिक कार्यकर्ते ॲड. महेंद्र गोस्वामी होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहनभाऊ पंचभाई, प्रमुख उपस्थितीत डॉ. योगेश रामटेके, डॉ. नंदागवळी, भारत मेश्राम, शंकर तेलमासरे, जया बनकर, कल्याणी शेंद्रे, मनोहर कावळे होते.
रमाई यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना ज्येष्ठ समाजसेवक ॲड. महेंद्र गोस्वामी म्हणाले, माता रमाई ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाच्या एका महासूर्याची सावली होती. माता रमाई ही त्यागमूर्ती होती, असे प्रतिपादन केले. या जयंतीनिमित्त प्रसिद्ध प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे प्रवचनदेखील आयोजित करण्यात आले होते. संचालन जनबंधू सर यांनी केले तर आभार लुकेश बनकर यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी चंद्रशेखर कावळे, राजेश येवले, प्रमोद बनकर, शुभम जांभूळकर, विकास धनविजय यांनी सहकार्य केले.