युनिव्हर्सल कारखाना खरेदीचे रामदेवबाबांचे संकेत

By admin | Published: June 1, 2016 01:43 AM2016-06-01T01:43:35+5:302016-06-01T01:43:35+5:30

युनिव्हर्सल फेरो कारखाना सुरु व्हावा याकरिता राजकीय पक्षात चढाओढ सुरु आहे. परंतु राजकारणाशी काही संबंध नसताना

Ramdev Baba's sign of the purchase of a universal factory | युनिव्हर्सल कारखाना खरेदीचे रामदेवबाबांचे संकेत

युनिव्हर्सल कारखाना खरेदीचे रामदेवबाबांचे संकेत

Next

आचार्य बालकृष्ण यांची माहिती : भारत स्वाभिमानचे राणा यांनी घेतली भेट
तुमसर : युनिव्हर्सल फेरो कारखाना सुरु व्हावा याकरिता राजकीय पक्षात चढाओढ सुरु आहे. परंतु राजकारणाशी काही संबंध नसताना भारत स्वाभिमान संघटनेने हरिद्वार येथे रामदेवबाबा व आचार्य बाळकृष्ण यांची भेट घेऊन युनिव्हर्सल फेरो कारखाना खरेदी करण्यासाठी निवेदन दिले. संबंधितांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याचे संकेत रामदेवबाबांनी दिले.
तुमसरजवळ मॅग्नीज शुद्ध करणारा युनिव्हर्सल फेरो कारखाना १० वर्षापासून बंद आहे. ३०४ एकर जागेतील हा कारखाना वैनगंगा नदीकाठावर आहे. भंडारा जिल्ह्यातील पहिला उद्योगाला अवकळा आली होती. वीज बिलापोटी कारखान्यावर २५० कोटी रूपये थकीत होते. अवसायानात गेलेल्या उद्योगातून बाहेर पडला नाही. दरम्यान येथील कामगार व संघटनांनी आंदोलने केली. दरम्यान कंपनी मालक व कामगारांनी नियमानुसार विविध आयुधांचा वापर केला. आजारी उद्योगधंद्यासाठी केंद्र शासनाने योजना राबविली. त्याचा लाभ या कारखान्यालाही झाला. परंतु कारखाना मात्र सुरु झाला नाही.
केंद्रात व राज्यात सत्ताबदल झाला. बेरोजगारांना रोजगार प्राप्त व्हावा, आर्थिक संपन्नता परिसरात यावी तथा स्थानिकांचा दबाव वाढून पुन्हा हा कारखाना चर्चेत आला. खासदार नाना पटोले यांनी हा कारखाना पतंजली उद्योगसमूह खरेदी करण्याच्या हालचाली सुरु असल्याची माहिती ‘लोकमत’ला दिली होती. त्यानंतर ‘युनिव्हर्सल फेरो कारखाना पतंजली घेणार’ या आशयाचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाले होते. त्यानंतर भारत स्वाभिमान संघटनेचे तुमसर तालुकाध्यक्ष रामदास राणा यांनी हरिद्वार येथे रामदेवबाबा व आचार्य बाळकृष्ण यांची भेट घेऊन युनिव्हर्सल फेरो खरेदीसंदर्भात निवेदन देऊन चर्चा केली. निवेदनासोबत लोकमतचे कात्रण दिले. युनिव्हर्सलसंबंधी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याचे संकेत रामदेवबाबांनी दिले. कारखाना खरेदीसंदर्भात कच्चा माल, वातावरण, रस्त्यांचे जाळे आदी तपासण्यात येणार असल्याचे रामदास राणा यांनी सांगितले. स्वदेशी, आॅरगॅनिक शेती याकडे रामदेवबाबांनी लक्ष देण्याचे आवाहन केल्याचे राणा यांनी सांगितले. कारखाना सुरू करण्यासंदर्भात आ.चरण वाघमारे यांनी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याशी यापूर्वी तिनदा चर्चा केली. कारखाना खरेदीसंदर्भात चर्चा सुरू आहे. १ जून रोजी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांच्या नेतृत्वात मोर्चाचे काढण्यात आला. जिल्हा परिषद सदस्य के.के. पंचबुद्धे येथे माडगी ते तुमसर लाँग मार्च काढणार आहेत. (तालुका प्रतिनिधी)

गडकरी यांची भूमिका महत्त्वाची
देश व राज्यातील दिग्गज भाजपनेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे लक्ष घातले तर या कारखान्याचा निकाल तातडीने लागू शकतो. येथे ना.गडकरी यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.
खरेदी-विक्री उद्योगपतीच करणार
शासन व प्रशासनावर दबाव आणला तरी शेवटी हा कारखाना उद्योगपतींनाच करावा लागणार आहे. कोट्यवधींचा हा कारखाना तांत्रिक अडचणीत आहे. शासन व प्रशासन येथे मध्यस्थीची भूमिका बजावू शकते. येथे दोन उद्योगपतींमध्ये करार होणे गरजेचे आहे.

Web Title: Ramdev Baba's sign of the purchase of a universal factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.