जिल्ह्यात रामनामाचा गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 11:21 PM2018-03-25T23:21:54+5:302018-03-25T23:21:54+5:30
हिंदूचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव रविवारी जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आकर्षक रोषणाई, ढोलताशांचा लयबद्ध गजर, देखावे आणि शोभायात्रा पाहण्यासाठी लाखोंचा उसळलेला जनसमुदाय हे या शोभायात्रेचे विशेष आकर्षण होते. ‘श्रीराम रामे मनोरमे’ असे वातावरण निर्माण होवून प्रभू रामचंद्रांच्या नावाचा गजर करण्यात आला.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : हिंदूचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव रविवारी जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आकर्षक रोषणाई, ढोलताशांचा लयबद्ध गजर, देखावे आणि शोभायात्रा पाहण्यासाठी लाखोंचा उसळलेला जनसमुदाय हे या शोभायात्रेचे विशेष आकर्षण होते. ‘श्रीराम रामे मनोरमे’ असे वातावरण निर्माण होवून प्रभू रामचंद्रांच्या नावाचा गजर करण्यात आला.
रविवारी दुपारी १२ वाजता श्री बहिरंगेश्वर देवस्थान तथा मोठा बाजार परिसरातील श्रीराम मंदिरात श्रीरामजन्मोत्सव सोहळा पार पडला. यापूर्वी भजन, कीर्तन रामजन्म कार्यक्रम, आरती व प्रसाद वितरीत करण्यात आला.
सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास सजविलेल्या आकर्षक रथातून प्रभू रामचंद्र, माता सीता व प्रभू लक्ष्मण यांच्या मूर्र्तींची भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
या शोभायात्रेत विविध मंडळाचे देखावे, झाकी साकारण्यात आली होती.
अतिथींच्या हस्ते पूजन करून शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, राष्टÑवादीचे प्रदेश महासचिव धनंजय दलाल, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, उपाध्यक्ष आशिष गोंडाणे, शोभायात्रा समितीचे अध्यक्ष संजय कुंभलकर, जिल्हा पोलिस अधीक्षक विनिता साहू, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, नगरसेवक चंद्रशेखर रोकडे, नितीन धकाते, मंगेश वंजारी, नितीन दुरगकर, रिंकू शर्मा, पंडित शिवा चेपे, यासह शेकडो भाविक उपस्थित होते. फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशांचा गजर वाखाणण्याजोगा होता. तरूणांमध्ये उत्साह ओसंडून वाहत होता.
आस्थेचे दर्शन घडविणारी 'रामजन्मोत्सव' शोभायात्रा
तुमसर : रामजन्माष्टमीच्या निमित्ताने तुमसर शहरात आस्थेचे दर्शन घडविणारी भव्यदिव्य शोभायात्रा काढण्यात आली. लोकनृत्यापासुन भगवान श्रीराम, लक्ष्मण, माता सीता व हनुमान यांच्या प्रतीकृतीसह शोभायात्रेत महादेवाचे तांडव नृत्य, छत्रपती शिवाजी महाराजांच्या युध्दचालीची प्रतीकृती अशा अनेक लोक कलाकृतींचा समावेश असलेली शोभायात्रा तुमसर शहरातून काढण्यात आली. शोभायात्रेत वेगवेगळ्या धार्मिक संस्थांमार्फत आपआपल्या परीने तंत्रज्ञानाचा वापर करुन चल प्रतीकृती सादर करण्यात आल्या.
तुमसर नगर पालिकेचे नगराध्यक्ष प्रदिप पडोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीरामांच्या प्रतीकृतीचे पुजन करुन शोभायात्रेचा शुभारंभ करण्यात आला. दरम्यान शहरातील प्रतिष्ठीत मान्यवर जगदीश कारेमोरे, तारीक कुरैशी, कल्याणी भुरे, पंकज कारेमोरे, सुनिल पारधी, श्याम धुर्वे, योगेश सिंगनजुडे, अमर रगडे, अनिल जिभकाटे, सचिन बोपचे व हजारोंच्या संख्येत भाविक महीला - पुरुष व लहान बालके उपस्थित होती.