रानडुकरांचा हैदोस शेतकऱ्यांच्या जीवावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 10:41 PM2018-09-26T22:41:37+5:302018-09-26T22:42:02+5:30
धान पिकाने अंतिम टप्पा गाठला आहे. धान पीक पुढील पंधरा दिवसात कापणीला येत आहेत. अशातच रानडुकरांच्या हैदोसाने पीक जमीनदोस्त करीत सुमार नुकसान होत आहे. वनविभाग सुस्त असल्याने कार्यवाही होत नाही. उपाययोजना नव्या तंत्राच्या असणे काळाची गरज आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : धान पिकाने अंतिम टप्पा गाठला आहे. धान पीक पुढील पंधरा दिवसात कापणीला येत आहेत. अशातच रानडुकरांच्या हैदोसाने पीक जमीनदोस्त करीत सुमार नुकसान होत आहे. वनविभाग सुस्त असल्याने कार्यवाही होत नाही. उपाययोजना नव्या तंत्राच्या असणे काळाची गरज आहे.
लाखनी तालुक्यातील पालांदूर मंडळ कृषी कार्यालया अंतर्गत सुमारे आठ हजार हेक्टरवर धान पीक जोमात आहे. परतीच्या पावसाने अपेक्षित हजेरी न लावल्याने पुन्हा शेतकºयांची पाण्याकरीता पायपीट करावी लागत आहे. महावितरण शेतकºयांना रात्रीची वीज देत असल्याने शेतावर रात्रीला जावेच लागते. एकट्या शेतकºयाची हिम्मत होत नसल्याने मुलाला, पत्नीला सोबत करीत शेत गाठावे लागत आहे. हातात कंदिल, टॉर्च घेत डुकरांच्या भीतीने मोठा आवाज करीत मार्ग काढावा लागत आहे.
मºहेगाव नाल्याकाठावरील झाडी झुडपात रानटी डुकरे दिवसाला लपून निवांत राहतात. शेतातील ऊसाच्या शेतात सुद्धा आश्रयीत राहून रात्रीला बेधुंद होत धान पिकावर तुटून पडतात. खाणे कमी व नुकसान अधिक होत असल्याने शेतकरी धास्तावला आहे.
वनविभाग नुकसान भरपाई २५ टक्के सुद्धा होत नाही. कित्येक वर्षापासूनचे ठरलेल्या दरानेच नुकसान भरपाई तुटपूंजी मिळत आहे. शेतकºयांच्या वास्तव नुकसानीचे मुल्य मिळत नाही. वन्यजीव संरक्षण कायद्याने हात बांधल्याने डुकरांचे नियंत्रण अशक्य झाले आहे. ऐन तोंडावर असलेल्या धान पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. वनविभागाच्या अधिकाºयांनी रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आहे.