सोनेगाव परिसरात सापडला दुर्मीळ खवल्या मांजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:34 AM2021-05-16T04:34:48+5:302021-05-16T04:34:48+5:30
खवल्या मांजर फारच कमी प्रमाणात पाहायला मिळतात. पूर्वी दाट जंगल होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वन्यजीव दिसत होते; परंतु वीस ...
खवल्या मांजर फारच कमी प्रमाणात पाहायला मिळतात. पूर्वी दाट जंगल होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वन्यजीव दिसत होते; परंतु वीस वर्षांपासून जंगल कमी झाले. त्यामुळे खवल्या मांजर दिसेनासे झाले आहेत.
खवल्या मांजराला इंग्रजीत पँगोलीन संबोधिले जाते. हा फोलिडोटा वर्गातला मॅनिडी कुळातील मॅनिस प्रजातीतील सस्तन प्राणी आहे. खवल्या मांजर आढळल्याचे माहीत होताच पहेला येथील सर्पमित्र उज्ज्वल रेहपाडे, देवा चवळे, मंगेश लोहनदासे, महेश हिवरकर, अमन चौधरी व मोहन शहारे यांनी तेथे धाव घेतली. खवल्या मांजराला पकडून भंडारा वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले. सोनेगाव परिसरात सापडलेल्या खवल्या मांजराचा आकार ३२ ते ३५ इंच आहे. खवल्या मांजर पोकळ झाडे किंवा बिळामध्ये राहत असते. हा प्राणी निशाचर असून, आपल्या लांब जिभेच्या साहाय्याने मुंग्या, वाळवी व जमिनीला खोदून मिळणारे किडे खात असतो. खवल्या मांजराला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.