दुर्मिळ खवल्या मांजर आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 12:51 AM2018-07-13T00:51:51+5:302018-07-13T00:54:00+5:30
दुर्मिळ प्रजातीचे खवल्या मांजर वन्यप्राणी बुधवारला खडकी येथील नाल्याशेजारी दिसून आले. ग्रामस्थांच्या मदतीने त्याला पकडण्यात आले. रात्री ११ वाजता तुमसर वनधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थित कोका अभयारण्यात सोडून जीवनदान देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : दुर्मिळ प्रजातीचे खवल्या मांजर वन्यप्राणी बुधवारला खडकी येथील नाल्याशेजारी दिसून आले. ग्रामस्थांच्या मदतीने त्याला पकडण्यात आले. रात्री ११ वाजता तुमसर वनधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थित कोका अभयारण्यात सोडून जीवनदान देण्यात आले.
सडक अर्जुनी तालुक्यातील कोसमतोंडी सहवनक्षेत्रात येणाऱ्या धानोरी येथे एका खवल्या मांजरासह सहा आरोपींना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली. या प्रकरणात खडकी येथील दोघांचा समावेश असून काल चौकशीसाठी आरोपींना परिसरात आणण्यात आल्याची कुणकुण ग्रामस्थांत होती. त्याच दिवशी सायंकाळी खवल्या मांजर खडकी गावात दिसून आल्याने आणखी लोकांना फसविण्याचा हा प्रकार तर नाही, अशी शंका घेत नागरिकांनी आक्रोश व्यक्त केला. वनाधिकाºयांनी घटनास्थळी येवून खवल्या मांजर न्यावे, अशी मागणी करण्यात आली. पालोरा येथील बीटगार्ड किरण बंसोड यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. ग्रामस्थांची समजूत घालत वरिष्ठांना माहिती दिली. पालोरा येथील वननिवासस्थानी आणण्यात आले. तुमसर वनकार्यालयातील कर्मचारी व वनक्षेत्रपाल कावळे यांनी पालोरा येथे पोहचून घटनेचा पंचनामा केला. ग्रामस्थांच्या विनंतीनुसार रात्री ११ वाजता दरम्यान कोका वन्यजीव अभयारण्याच्या घनदाट जंगलात सोडण्यात आले.