कोरोनाबाधितांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी विरलीकर तरुणाईचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:34 AM2021-04-18T04:34:54+5:302021-04-18T04:34:54+5:30

सद्य:स्थितीत समाजाचा कोरोनाबाधित रुग्णांकडे बघण्याचा दृष्टिकोन पार बदलला आहे. या रोगाची अपरिहार्यता अशी आहे की, स्वतःच्या कुटुंबीयांनाही आपल्या जीवलगांना ...

Rare Youth Initiative to boost the morale of the corona sufferers | कोरोनाबाधितांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी विरलीकर तरुणाईचा पुढाकार

कोरोनाबाधितांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी विरलीकर तरुणाईचा पुढाकार

googlenewsNext

सद्य:स्थितीत समाजाचा कोरोनाबाधित रुग्णांकडे बघण्याचा दृष्टिकोन पार बदलला आहे. या रोगाची अपरिहार्यता अशी आहे की, स्वतःच्या कुटुंबीयांनाही आपल्या जीवलगांना नाइलाजाने जुन्या काळातील अस्पृश्यांसारखी वागणूक द्यावी लागत आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्ण खचून जाण्याची शक्यता आहे. अशा कठीण प्रसंगी या रुग्णांना दिलासा देण्यासाठी येथील ग्रामायण प्रतिष्ठानचे सदस्य अतुल भेंडारकर यांनी पुढाकार घेऊन राष्ट्रवादी युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष राकेश राऊत, किशोर बगमारे, आदी मित्रमंडळींसह गावातील कोरोनाबाधित रुग्णांची भेट घेऊन त्यांची आस्थेने विचारपूस केली. यावेळी या तरुणांनी सदर रुग्णांना पेनखजूरची पाकिटे भेट देऊन त्यांना कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी प्रवृत्त केले.

यावेळी अतुल भेंडारकर यांनी कोरोनाबाधितांना मदत करून त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी गावातील सेवाभावी संस्था आणि गणमान्य नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन केले.

Web Title: Rare Youth Initiative to boost the morale of the corona sufferers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.