पालोरा येथे वीज उपकेंद्रासाठी रास्ता रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:40 AM2021-08-21T04:40:45+5:302021-08-21T04:40:45+5:30
महिन्याभरापासून वारंवार वीज जात आहे. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या गावातील शेतकऱ्याकडे मोटार पंप आहेत. ...
महिन्याभरापासून वारंवार वीज जात आहे. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या गावातील शेतकऱ्याकडे मोटार पंप आहेत. विजेच्या लपंडाव सुरू असल्याने सबस्टेशन काम लवकर होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी यापूर्वी १५ ऑगस्टला सबस्टेसन पालोरा (चौ.) येथे सामूहिक श्रमदान केले. मात्र काम पूर्णत्वास आले नाही. म्हणून शेतकऱ्यांनी संबंधित विभागाचे अभियंता यांना निवेदन दिले. त्यामध्ये १९ ऑगस्टपर्यत काम पूर्ण करून देण्याचे सांगितले. मात्र तसे झाले नाही म्हणून शुक्रवारी रास्ता रोको आंदोलन करण्याचे पत्र दिले. वीज पारेषण कंपनी पवनी कार्यालयाचे उपकार्यकरी अभियंता भोयर यांनी ३१ऑगस्टपर्यंत कंत्राटदार काम पूर्ण करून देईल, असे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे तात्पुरते आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी अड्याळ पोलीस ठाणेतर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनाचे नेतृत्व त्र्यंबक गिऱ्हेपुंजे, सरपंच अनिता गिऱ्हेपुंजे, राजू मेंगरे, रवी हुकरे, प्रमोद चावरे, सुनील रघुते व शेकडो शेतकरी उपस्थित होते.
200821\1749-img-20210820-wa0014.jpg
राज्यमार्ग अडवताना शेतकरी