सिमेंट रस्त्यावर पुन्हा पक्के बांधकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 06:00 AM2020-02-06T06:00:00+5:302020-02-06T06:00:44+5:30
सिहोरा परिसरातील गावात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत खडीकरण, डांबरीकरण आणि सिमेंट रस्ता तयार करण्यात येत आहेत. मुरली गावात राज्य मार्ग ३५९ ते मुरली मांगली गावांना जोडणाऱ्या दोन किलोमीटर अंतराच्या रस्ता बांधकामाकरिता २ कोटी ८४ लाख ७२ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तिरोडा येथील एका कंपनीला कामाचे कंत्राट देण्यात आले आहे. या कंपनीमार्फत गावात रस्ता बांधकाम सुरु करण्यात आले आहैे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : ग्रामपंचायती अंतर्गत गावात बांधकाम करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यावर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सीमेंट रस्ता तयार करण्यात येत असल्याने गावकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. हा प्रकार मुरली गावात उघडकीस आलेला आहे.
सिहोरा परिसरातील गावात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत खडीकरण, डांबरीकरण आणि सिमेंट रस्ता तयार करण्यात येत आहेत. मुरली गावात राज्य मार्ग ३५९ ते मुरली मांगली गावांना जोडणाऱ्या दोन किलोमीटर अंतराच्या रस्ता बांधकामाकरिता २ कोटी ८४ लाख ७२ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तिरोडा येथील एका कंपनीला कामाचे कंत्राट देण्यात आले आहे. या कंपनीमार्फत गावात रस्ता बांधकाम सुरु करण्यात आले आहैे. या मार्गावर ग्रामपंचायत अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करण्यात आले आहे. याच रस्त्यावर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सीमेंट रस्ता तयार करण्यात येत आहे. सीमेंट रस्ता बांधकामाकरिता अन्य जागा उपलब्ध असताना कंत्राटदाराने जुन्याच सिमेंट रस्त्यावर सिमेंट रस्ता तयार करण्याकरिता पुढाकार घेतला आहे. यामुळे गावकऱ्यांचे भुवया उंचाविल्या आहेत. ग्रामपंचायत अंतर्गत बांधकाम करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याची गुणवत्ता किती वर्षाची होती. ग्रामपंचायतने गावातच दोन वर्षात सिमेंट रस्ता तयार केला आहे. या रस्त्यावर व्हीरिंग कोड तयार करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. गावात कामे सुरु असून या कामाची साधी नकल प्रत ग्रामपंचायतकडे उपलब्ध नाही. यामुळे कामाचे गुणवत्ता संदर्भात गावकरी ग्रामसभेत वारंवार प्रश्न उपस्थित करीत गावकरी ग्रामसभेत वारंवार प्रश्न उपस्थित करीत असल्याने सरपंचाचे टेंशन वाढत आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत पाच वर्षपर्यंत देखभाल आणि दुरुस्तीकरिता कंपनी करारबद्ध असल्याचे नमूद असले तरी नंतर कुणी ढुंकूनही पाहत नाही. या योजनेत गावात घोळ करण्यात येत आहे. अन्य जागेत सिमेंट रस्ता तयार केला असता तर गावकºयांना आणखी एक नवीन सिमेंट रस्ता मिळाला असता असा सूर आहे.
ग्रामपंचायत अंतर्गत बांधकाम करण्यात आलेल्या सिमेंट रस्ते दुरुस्तीची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची आहे. गावात सिमेंट रस्त्यावर दुरुस्तीकरिता सिमेंट रस्ता तयार करण्यात येत असताना साधी माहिती सरपंच यांना देण्यात आली नाही. गावात कामे करणाऱ्या बाहेरील कंपन्या कामे होताच निघून जात आहेत. निकृष्ट बांधकामाचा पुन्हा गावकऱ्यांना सोसावा लागत आहे.
रुपेरा गावात अडविले काम
रुपेरा गावात नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यावर पुन्हा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सिमेंट रस्ता तयार करण्याकरिता पुढाकार घेण्यात आले असता अडविण्यात आले आहे. ग्रामपंचायत अंतर्गत बांधकाम करण्यात आलेला सिमेंट रस्ता चोरीला जाण्याची भीती निर्माण झाल्याने ग्रामपंचायत अंतर्गत नवीन जागेत सिमेंट रस्ता बांधकाम करण्याचे बजाविले आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत कंत्राटदार आणि यंत्रणा साटेलोटे करीत दिशाभूल करीत असल्याचे या गावात दिसून आले होते. यानंतर कंत्राटदारांनी रस्ता तयार केले नाही.
मुरली गावात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत कामे सुरु असली तरी अंदाजपत्रक प्राप्त झाले नाही. कामाची गुणवत्ता माहीत नाही.
-राजेश बारमाटे, सरपंच मुरली.