ग्रामपंचायत सरपंच सेवा संघाची फेरनिवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:32 AM2021-07-26T04:32:17+5:302021-07-26T04:32:17+5:30

बोंडगावदेवी : तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच-उपसरपंचांची संयुक्त सभा नुकतीच घेण्यात आली. त्यात तालुकास्तरावरील ग्रामपंचायत सरपंच सेवा संघाच्या अध्यक्षपदी सिरेगाव बांधचे ...

Re-election of Gram Panchayat Sarpanch Seva Sangh | ग्रामपंचायत सरपंच सेवा संघाची फेरनिवड

ग्रामपंचायत सरपंच सेवा संघाची फेरनिवड

Next

बोंडगावदेवी : तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच-उपसरपंचांची संयुक्त सभा नुकतीच घेण्यात आली. त्यात तालुकास्तरावरील ग्रामपंचायत सरपंच सेवा संघाच्या अध्यक्षपदी सिरेगाव बांधचे सरपंच इंजि. हेमकृष्ण ऊर्फ दादा संग्रामे यांची दुसऱ्यांदा फेरनिवड करण्यात आली, तर सरचिटणीसपदी महालगाव ग्रामपंचायतचे सरपंच अशोक कापगते यांची निवड करण्यात आली.

ग्रामपंचायत स्तरावर उद्‌भवणाऱ्या समस्या मार्गी लावण्यासाठी तालुकास्तरावर सरपंच सेवा संघ स्थापन करण्यात आले. तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच-उपसरपंचांची सभा सोमवारी (दि.१९) पंचायत समितीच्या बचत भवनात संघाचे अध्यक्ष हेमकृष्ण संग्रामे यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली.

सभेत ग्रामपंचायत स्तरावरील समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच संघाच्या तालुका ग्रामपंचायत सरपंच सेवा संघाच्या अध्यक्षपदी संग्रामे यांची फेरनिवड, तर सरचिटणीसपदी कापगते यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी संजय खाकडे (कान्होली), प्रकाश शिवणकर (खांबी), प्रभाकर कोवे (महागाव), युवराज तरोणे (सावरटोला), महिला उपाध्यक्ष शुभांगी तिडके (तुकूमनारायण), कुंदा डोंगरवार, सरिता लंजे, सहसरचिटणीस डॉ. अंजय अंबादे, भोजराम लोडगे, कोषाध्यक्ष हेमराज पुस्तोडे, प्रसिद्धीप्रमुख लक्ष्मीकांत नाकाडे, किशोर ब्राह्मणकर, मार्गदर्शक रघुनाथ लांजेवार, कार्यकारी सदस्य नंदू पाटील गहाणे, भगवान नाकाडे, पपिता नंदेश्वर, अनिल पालीवाल, विश्वनाथ बाळबुद्धे, बाबूल बलिक, लीलेश्वर खुणे, दीपक सोनवाने, विलास फुंडे, सोनिया वाढई, सुजाता गुडेकर, सुनीता मस्के आदींचा समावेश आहे. संचालन व प्रास्ताविक संग्रामे यांनी केले. आभार डॉ. अजय अंबादे यांनी मानले.

Web Title: Re-election of Gram Panchayat Sarpanch Seva Sangh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.