आवास योजनेतील अपात्र लाभार्थ्यांचे फेरसर्वेक्षण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:37 AM2021-08-26T04:37:34+5:302021-08-26T04:37:34+5:30
तालुका भाजपाचे निवेदन लाखनी : प्रधानमंत्री आवास योजनेतील प्रपात्र ''ड'' यादीतील अपात्र घरकुल लाभार्थ्यांचे पुन्हा सर्वेक्षण करून पात्र ...
तालुका भाजपाचे निवेदन
लाखनी : प्रधानमंत्री आवास योजनेतील प्रपात्र ''ड'' यादीतील अपात्र घरकुल लाभार्थ्यांचे पुन्हा सर्वेक्षण करून पात्र यादीत समावेश करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार व खंडविकास अधिकाऱ्यांना निवेदनाच्या माध्यमातून केली आहे .
ग्रामीण भागातील गरीब अल्पभूधारक तसेच घर नसलेल्या व्यक्तिंना घर देण्यासाठी केंद्र सरकारमार्फत प्रधानमंत्री आवास योजना राबविली जात आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतील प्रपत्र ''ड''ची यादी सन २०१८ला सर्व ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेतून मंजूर करण्यात आली होती.
एन. आ. सी. प्रणालीद्वारे पंचायत समितीमार्फत संगणक परिचालकांकडून व ग्रामसेवकांकडून चुकीची माहिती दिल्यामुळे त्या यादीतील तालुक्यातील जवळपास २,५०० घरकुल लाभार्थी प्रधानमंत्री आवास योजनेपासून अपात्र झालेले आहेत. तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजनेतील प्रपत्र ''ड'' यादीतील पाथरी घरकुल लाभार्थ्यांचे पुन्हा सर्वेक्षण करून पात्र करण्याची प्रक्रिया करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.
निवेदन देताना भाजपाचे तालुकाध्यक्ष धनंजय घाटबांधे, भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश बांते, भाजपा किसान आघाडीचे प्रदेश सदस्य घनश्याम पाटील खेडीकर, भाजपा जिल्हा महामंत्री पद्माकर बावनकर, ज्येष्ठा आघाडीचे डॉ. सुदाम शहारे, तालुका महामंत्री सत्यवान वंजारी, उपसरपंच शेषराव वंजारी, मनिराम बोळणे, रजनी पडोळे, ज्योती निखाडे, मंगेश मेश्राम, उमेश गायधनी, पंकज चेटुले आदी उपस्थित होते.
250821\img-20210824-wa0089.jpg
photo