वाचन संस्कृतीसाठी यावर्षीपासून ‘प्रेरणा दिन’

By admin | Published: October 14, 2015 12:39 AM2015-10-14T00:39:04+5:302015-10-14T00:39:04+5:30

शिक्षणाच्या माध्यमातून मुलांमधये सकारात्मक विचार रुजला जावा. वाचनामुळे बालमनावर संस्कार होताना विचारांना चालना मिळावी,....

For the reading culture this year 'inspiration day' | वाचन संस्कृतीसाठी यावर्षीपासून ‘प्रेरणा दिन’

वाचन संस्कृतीसाठी यावर्षीपासून ‘प्रेरणा दिन’

Next

शिक्षण विभागाचा पुढाकार : अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवशी विविध उपक्रमांचे आयोजन
राजू बांते मोहाडी
शिक्षणाच्या माध्यमातून मुलांमधये सकारात्मक विचार रुजला जावा. वाचनामुळे बालमनावर संस्कार होताना विचारांना चालना मिळावी, यासाठी वाचनाची प्रेरणा निर्माण व्हावी यासाठी मिसाईलमॅन डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून १५ आॅक्टोबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. याबाबत शालेय शिक्षण विभागाने परिपत्रक जारी केले आहे.
डॉ.कलाम यांनी बहुतांश पुस्तके मुले व शिक्षकांसाठी लिहिली आहेत. बालमनावर शाळेतूनच संस्कार होतात. मुलांना आणि शिक्षकांना नेहमी चांगले विचार समजून जगण्याची व वागण्याची कृती करावयाची असल्यास त्यासाठी विद्यार्थ्यांना वाचन गरजेचे आहे. वाचनाची सवय लागून वाचन सुरु राहायला पाहिजे. या उद्देशाने डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवशी राज्य शासनाने वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
डॉ.एपीजे अब्दुल यांचे व्यक्तीमत्व असामान्य होते. प्रगत भारताचे स्वप्न त्यांनी भारतीयांसमोर ठेवले. वैचारिक पातळीवर एका वेगळ्या पर्वाला सुरुवात झाली. प्रगत भारताचे डॉ.कलाम यांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर विद्यार्थी शिक्षित होतात, ते सुसंस्कारीत होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना वाचनास प्रवृत करणे काळाची ही गरज ओळखून डॉ.कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस साजरा व्हावा व वाचनाची प्रेरणा निर्माण होऊन ती टिकून राहावी यासाठी शाळांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
डॉ.कलाम या नावाने वाचन कट्टा निर्माण केला जावा, समाज सहभागातून या कट्यासाठी पुस्तके गोळा करून शाळेत पुस्तकपेढी तयार करावी, प्रत्येक विद्यार्थ्यांने एक पुस्तक वाचनाचा संकल्प करावा. प्रत्येक शिक्षकाने किमान एका पुस्तकाचे वाचन करावे. वाचन प्रेरणा ही चळवळ होण्याकरिता प्रत्येक व्यक्तीचे योगदान महत्त्वाचे आहे. यासाठी एक व्यक्ती एक पुस्तक भेट उपक्रम राबविला जावा. प्रत्येक व्यक्तीने, शिक्षकांनी, माजी विद्यार्थी, पालकांनी एका विद्यार्थ्याला, शाळेला, विद्यार्थ्यांच्या वयाला अनुरुप होतील अशी पुस्तके भेट द्यावी, विद्यार्थ्यांना आनंदाने वाचन करण्यासाठी ‘वाचू आनंदे’, या तासिकेचे आयोजन करण्यात यावे. चांगल्या पुस्तकांविषयी चर्चासत्राचे आयोजन करण्यात यावे. डॉ.कलाम यांच्या पुस्तकावर आधारित व्याख्यानांचे आयोजन करण्यात यावे. लेखक, कविंना विद्यार्थ्यांना संवाद साधण्यासाठी आमंत्रित करण्यात यावे. पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करावे. महान व्यक्तींच्या आयुष्यात वाचनामुळे घडलेले संस्काराविषयी माहिती देण्यात यावी. पुस्तकांचे वाटप करून, वाचन दिन व अध्यापन दिन साजरा करावा. विद्यार्थ्यांचे पुस्तकांवर चर्चासत्र घडवून आणावे. वाचनाची सवय विद्यार्थ्यांमध्ये लागावी याकरिता सर्व उपक्रम देण्यात आली आहेत.
सर्व शिक्षा योजनेअंतर्गत वाचनाची सवय निर्माण करणे या उपक्रमासाठी जिल्हास्तरावर निधी उपलब्ध करुन दिला आहे. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत ग्रंथ महोत्सवासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. येणाऱ्या वर्षामध्ये प्रत्येक शाळेतील तिसऱ्या इयत्तेपुढील प्रत्येक मुल वाचन प्रेरणा दिनी किमान १० छोटी पुस्तके वाचेल या बेताने मुलांना वाचन, वाचनाची गती व वाचनाची सवय शिकविण्यात यावी.

नावापुरते पुस्तके
‘यु डायस’ या माहितीबाबत जाणून घेतले असता बहुतांश शाळांमध्ये पुस्तकालये नाहीत. आहेत त्याठिकाणी पुरेशी पुस्तके नाहीत. खासगी शाळांमध्येही असलेल्या ग्रंथालयामध्ये केवळ नावापुरते पुस्तके आहेत.

शाळेचे वाचनालय समृद्ध करण्यासाठी सर्व शाळांनी लोकसहभाग घ्यावा. विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता मजबुतीसाठी सक्षम व पुरेसा शाळेत वाचनालय असावा.
- शंकर राठोड
वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी पं.स. मोहाडी.

Web Title: For the reading culture this year 'inspiration day'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.