रियल इस्टेट बाजार जोरात; घर विक्रीच्या श्रावणसरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:39 AM2021-08-13T04:39:41+5:302021-08-13T04:39:41+5:30
बॉक्स प्लॉटमधील गुंतवणूक अधिक सुरक्षित... अनेक शासकीय कर्मचारी, अधिकारी तसेच मध्यम वर्गीय माणसे पैशाचा विनियोग करण्यासाठी प्लॉट खरेदीस प्राधान्य ...
बॉक्स
प्लॉटमधील गुंतवणूक अधिक सुरक्षित...
अनेक शासकीय कर्मचारी, अधिकारी तसेच मध्यम वर्गीय माणसे पैशाचा विनियोग करण्यासाठी प्लॉट खरेदीस प्राधान्य देतात. प्लॉटच्या किमती दिवसेंदिवस वाढत चालल्याने प्लॉटची गुंतवणूक फायदेशीर ठरते; मात्र तरीही प्लॉट खरेदी करताना आपली फसवणूक होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे.
घरात अद्याप सामान्यांच्या आवाक्याबाहेर
बॉक्स
प्रत्येक माणसाचे स्वतःच्या घराचे स्वप्न असते. त्यासाठी अनेक जण कर्ज काढून घर खरेदी, घराचे बांधकाम करतात. कोरोनानंतर बांधकाम, स्टील, सिमेंटचे दर वाढले असल्याने त्या तुलनेत फ्लॅट खरेदी परवडते.
जयंत केवट, रियल इस्टेट व्यावसायिक,भंडारा.
बॉक्स
नवीन अध्यादेशाने अडचणीत वाढ....
शासनाने १२ जुलै रोजी काढलेल्या नवीन अध्यादेशानुसार जमिनीचे ११ गुंठ्यापेक्षा लहान लहान तुकडे करून जमिनीची विक्री करण्यासाठी आता जिल्हाधिकारी यांची परवानगी घेणे अनिवार्य ठरणार आहे. कोरडवाहूसह बागायती क्षेत्राची विक्री करतानाही अडचणीचे ठरणार आहे.
बॉक्स
म्हणून वाढल्या घरांच्या किमती
जागा मिळेनात....
भंडारा शहर दिवसेंदिवस वाढत असल्याने जागेचा प्रश्न गंभीर बनत आहे. त्यामुळेच प्लॉटच्या किमती भरमसाठ वाढत असल्याने जागेचा प्रश्न गंभीर बनत आहे. त्यामुळे शेतीचे क्षेत्रही कमी होत आहे.
सिमेंट...
तीन महिन्यांपूर्वी सिमेंटच्या एका पोत्याची किंमत तीनशे रुपयेपर्यंत होती; मात्र आता तेच सिमेंट साडेतीनशेवर पोहोचले आहे.
वाळू....
जिल्ह्यात अनेक रेतीघाटांचा लिलाव झाला नसल्याने अधिक दराने रेती विकत घ्यावी लागते. जिल्ह्यात रेती असतानाही लिलावाचे कारण सांगून जादा दराने विक्री केली जात आहे.
स्टील...
कोरोनापूर्वी स्टीलच्या किमती कमी होत्या; मात्र आता पंधरा ते पंचवीस रुपये किलोमागे अधिकचे दर वाढले आहेत.