वन उद्यानात होतेय औषधी रोपांचे संगोपन

By admin | Published: November 13, 2016 12:27 AM2016-11-13T00:27:11+5:302016-11-13T00:27:11+5:30

सामाजिक वनीकरण परिक्षेत्र अधिकारी कार्यालय देवरीअंतर्गत येणाऱ्या सडक अर्जुनी तालुक्यातील ...

Rearing of medicinal plants in forest park | वन उद्यानात होतेय औषधी रोपांचे संगोपन

वन उद्यानात होतेय औषधी रोपांचे संगोपन

Next

पर्यटकांसाठी आकर्षक : तालुक्यात लावली ७५ हजार रोपे
सडक अर्जुनी/देवरी : सामाजिक वनीकरण परिक्षेत्र अधिकारी कार्यालय देवरीअंतर्गत येणाऱ्या सडक अर्जुनी तालुक्यातील सडक अर्जुनी, शेंडा, कोहमारा-कोकणा, खजरी-डव्वा, घटेगाव-घोटी, श्रीरामनगर, उशीखेडा-कोयलारी, पुतळी-कोयलारी, मुंडीपार-पांढरी या मार्गावर व मिश्र रोपवनात ७५ हजार झाडे लावून त्याचे संगोपन केले जात आहे. याशिवाय नवाटोला येथील वनउद्यानात औषधी वनस्पतींच्या रोपांचे संगोपन केले जात असल्यामुळे हे उद्यान हौशी पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे.
सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून लावण्यात आलेली झाडे १०० टक्के आजही जिवंत आहेत. रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावल्याने अनेक मार्ग हिरवेगार झाल्याचा आनंद मिळतो. वनीकरणाच्या माध्यमातून अनेकांना रोजगारही उपलब्ध झाला आहे.
सामाजिक वनीकरण कार्यालय गोंदियाअंतर्गत मौजा नवाटोला येथील गट क्रमांक ३१६/४१७ वर पाटील जैवविविधता वन उद्यान तयार करण्यात आले आहे. एकूण २.५० हेक्टर आर क्षेत्रमध्ये हे उद्यान तयार करण्यात आले आहे. या उद्यानात लावण्यात आलेल्या झाडांना नियमित सिंचनाची सोय व्हावी यासाठी दोन लाख लिटर पाण्याचा जलकुंभ तयार करण्यात आला आहेत. स्व.उत्तमराव पाटील जैव विविधता वन उद्यान नवाटोला हे राष्ट्रीय महामार्गाला लागून जुन्या चेक पोस्टजवळ आहे.
उद्यानाचे काम गेल्या एक वर्षापासून प्रगतीपथावर आहे. या उद्यानातील वनांची वेगवेगळी १६ नावे देण्यात आली आहेत. या वनात नक्षत्रावर आधारित विविध राशीवर, नव ग्रहावर आधारित वृक्षांची लागवड केली आहे. ह्यात १३५४ रोपांची संख्या आहेत.
मानवाच्या दृष्टीस दिसत नाही अशाही नवीन नावांची औषधी रोपे पहावयास मिळतात. वन उद्यानात दिवसभर निसर्गाचा आनंद घेण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरील हौसी पर्यटक टिफीन आणून जेवणाचा आनंद घेताना दिसतात. पर्यटकांना विश्रांतीसाठी फारच उपयोगाचे हे औषधीवन उद्यान ठरले आहे. ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी सुलभ शौचालय-बाथरुमची सुविधाही केली आहे. (शहर प्रतिनिधी)

वनात पहायला मिळतात पारंपरिक ते आधुनिक वृक्ष
उद्यानाला वनोऔषधी उद्यान असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यात महाभारत, वन-फणस, तेजपान, हिरडा, कदम, चंदन, कन्हेर, बेल, खवट, रूई, आवळा, अशोक, जांभुळ, खिरनी अशा १३ वनोषधीची रोपे लावली आहेत. रावण वन-आंजन, जास्वंद, महा, आवळा, पळस, आंबा, टेटू, खवट, फणस, पिंपळ, अशोक, बेल यांचीही झाडे आहेत.
जैन वन-पिंपळ, नाकेशक, बांबू, वळ, बकूळ, आंबा, सप्तपर्णी ही रोपे या वनात आहेत. बुद्धवन- पिंपळ, वळ, बेल, कडूनिंब, पाकड, चंपा आदी रोपे आहेत. अल्टीनेशन गार्डनमध्ये वन-जास्वंद, गिलगिरी, जांभुळ, चंदन हे आहेत.
गणेशवन, ख्रिश्चनवन, सप्तश्रृती वन, त्रिफळा वन, फ्रुटवन, शिखवन, अशोक वन, नंदनवन, उस्काम वन, बांबूवन, चिर्ल्ड नपार्क, नक्षत्रवन या वनात औषधीयुक्त विविध २६० जातींची रोपे लावण्यात आली आहेत.

Web Title: Rearing of medicinal plants in forest park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.