धारगावच्या जिल्हा बँकेला ‘लिंक फेल’चे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 10:56 PM2019-02-04T22:56:30+5:302019-02-04T22:56:51+5:30

शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख असलेल्या भंडारा तालुक्यातील भंडारा डिस्ट्रीक्ट सेंट्रल को आॅप. बँक लि. भंडारा शाखा धारगाव येथील व्यवहार गत आठवडाभरापासून 'लिंक फेल'मुळे ठप्प झाली आहे. त्यामुळे खातेधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

Receive 'Link Fail' to District Bank of Dhargaon | धारगावच्या जिल्हा बँकेला ‘लिंक फेल’चे ग्रहण

धारगावच्या जिल्हा बँकेला ‘लिंक फेल’चे ग्रहण

Next
ठळक मुद्देखातेधारक त्रस्त : आठवडाभरापासून व्यवहार ठप्प, उपाययोजना करण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख असलेल्या भंडारा तालुक्यातील भंडारा डिस्ट्रीक्ट सेंट्रल को आॅप. बँक लि. भंडारा शाखा धारगाव येथील व्यवहार गत आठवडाभरापासून 'लिंक फेल'मुळे ठप्प झाली आहे. त्यामुळे खातेधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
भंडारा तालुक्यातील धारगाव येथे एकमेव जिल्हा बँक आहे. या बँकेत परिसरातील खुटसावरी, माडगी, टेकेपार, खुर्शीपार, राजेगाव, कन्हाळमोह, डव्वा, गुंथारा, चितापूर, धारगाव, कोकणागढ, खुर्शीपार, वाघबोडी आदी गावातील शेकडो नागरिकांचे खाते आहे. नागरिकांना या बँकेसोबत नेहमी व्यवहार करावा लागतो. मात्र गत आठवड्या भरापासून या बँकेत लिंक फेलचा फलक लावलेला आहे. त्यामुळे बँक ग्राहकांना आल्यापावली घरी परतावे लागत आहे. यासंबंधी सोमवारला बँकेत फेरफटका मारला असता बँकेसमोर ग्राहकांची एकच गर्दी दिसून आली. बँकेत एका व्यवस्थापकासह तीन कर्मचारी उपस्थित होते. लिंक फेलविषयी एका महिला कर्मचाºयाशी चर्चा केली असता त्यांनी गत गुरूवारपासून लिंकफेल असल्यामुळे व्यवहार झालेला नाही. शनिवारला काहीवेळ व्यवहार सुधारित सुरू होता. रविवारला सुटी होती. आज सोमवार रोजी पुन्हा लिंक फेल आहे. त्यामुळे व्यवहार होणार नाही, असे सांगितले.
एकंदरीतच परिसरातील खातेधारकांना सकाळपासूनच आर्थिक व्यवहार करण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. मात्र तांत्रिक कारण पुढे येत असल्याने त्यांना आल्यापावली परतावे लागते.
लिंक फेलच्या काळात उपाययोजना असावी
इंटरनेटच्यायुगात लिंकफेल खातेदारांसाठी त्रासदायक ठरत आहे. ग्राहकांच्या सेवेसाठी असलेल्या जिल्हा बँकेने लिंक फेलदरम्यान ग्राहकांना ताटकळत न ठेवता त्यांची समस्या दूर करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना दररोज व्यवहारासाठी येरझाºया मारणे परवडत नाही. त्यांना आर्थिक व शारीरिक त्रास होतो. याकडे जिल्हा बँकेच्या अध्यक्षांनी लक्ष केंद्रीत करून ग्राहकांच्या सेवेसाठी उपाययोजना करण्याची नितांत आवश्यकता आहे.

Web Title: Receive 'Link Fail' to District Bank of Dhargaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.