संत गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्सवांतर्गत सत्कार व वस्त्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:28 AM2020-12-26T04:28:24+5:302020-12-26T04:28:24+5:30

लाखांदूर : संत गाडगेबाबा यांच्या ६४ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमीत्त स्थानिक लाखांदूर येथील संत गाडगेबाबा ...

Reception and donation of clothes during Sant Gadge Baba Punyatithi Mahotsav | संत गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्सवांतर्गत सत्कार व वस्त्रदान

संत गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्सवांतर्गत सत्कार व वस्त्रदान

googlenewsNext

लाखांदूर : संत गाडगेबाबा यांच्या ६४ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमीत्त स्थानिक लाखांदूर येथील संत गाडगेबाबा जनकल्याण उत्सव समिती अंतर्गत आयोजित 27 व्या पुण्यतिथी महोत्सव कार्यक्रमात विविध नागरिक, विद्यार्थ्यांचा सत्कार व गरजूंना वस्त्रदान करण्यात आले. सदर कार्यक्रम 20डिसें.रोजी लाखांदूर येथे आयोजित करण्यात आला होता.

यावेळी संत गाडगेबाबा जनकल्याण उत्सव समिती अंतर्गत संत गाडगेबाबा पुण्यतिथी अंतर्गत श्रद्धांजली व अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमांतर्गत विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्ये करना-या नागरिक,अधिकारी,कर्मचारी व विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला.त्यानुसार देशसेवा कार्याबद्दल मेजर प्रशांत दोनाडकर यांना विश्वसंत गाडगेबाबा ग्राम भुषण,कोरोना योद्धा म्हणून पोलिस उपनिरीक्षक संदीप ताराम,आरोग्य सेवक गुरुदास डोंगरवार, अधिपरिचारिका यामिनी देशमुख,व 9 आशा स्वयंसेविका व 3 ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी वर्ग 10 व 12 मध्ये प्राविन्यप्राप्त अन्शुदा ठवरे व स्नेहा निमजे यांचा यांचा सत्कार तर 20विद्यार्थ्यांसह 3गरिब गरजू निराधार महिलांना वस्त्रदान करण्यात आले.दरम्यान सामाजिक कार्यकर्ता नरेश दिवठे व समिती सदस्य सुनिल तोंडरे यांच्या उपस्थिती आयोजीत काय्रक्रमाचे प्रास्ताविक नरेश दिवठे यांनी केले.

कार्यक्रमाचे संचालन विरेंद्रकुमार कडिखाये यांनी तर कार्यक्रमाचे अहवाल वाचन व आभार फागो कडिखाये यांनी मानले.यावेळी स्थानिक लाखांदूर येथील बहुसंख्य महिला पुरुष नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Reception and donation of clothes during Sant Gadge Baba Punyatithi Mahotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.