आरोग्य कर्मचारी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:40 AM2021-08-20T04:40:40+5:302021-08-20T04:40:40+5:30
१९ लोक ०१ के खराशी : खराशी ग्रामपंचायतीच्या तर्फे ७५ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून गावातील आरोग्य कर्मचारी,गुणवंत विद्यार्थी,गावात उत्कृष्ट ...
१९ लोक ०१ के
खराशी : खराशी ग्रामपंचायतीच्या तर्फे ७५ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून गावातील आरोग्य कर्मचारी,गुणवंत विद्यार्थी,गावात उत्कृष्ट कार्य करणारे युवक यांचा स्मृतिचिन्ह शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
ग्रामपंचायत इमारतीवर सरपंच अंकिता झलके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र खराशी येथील कर्मचारी डॉ. अर्चना सोनटक्के, डॉ. भुसारी,परिचर टिकाराम कावळे,लक्ष्मी कहालकर, अंगणवाडी सेविका कौशल्या आठोडे,कांचन मेश्राम,यामिनी लांबकाने,जि. प. प्राथमिक शाळेतून नवोदय साथी निवड झालेले विद्यार्थी यथार्थ चेटूले,ध्यानेश्वरी झलके, रावजी फटे विद्यालयातील कल्याणी कोरे, मयुरी मेंढे, तर विवेकानंद विद्यालयातील मनिकेत भेंडारकर, ईशा हेमणे यांचा सन्मान करण्यात आला.
जिल्ह्यात तबला वादनात प्रथम पारितोषिक पटकवणारा धीरज चेटूले आणि लाखनी पंचायत समितीमध्ये प्रथम पुरस्कार प्राप्त हितेश झलके,यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी खराशी ग्रामपंचायतीच्या सरपंच अंकिता झलके, उपसरपंच सुधन्वा चेटूले,ग्रा.पं.सदस्य शिवचरण जगनाडे, राष्ट्रपाल मेश्राम, पंचशीला शेंडे, विशाखा शेंडे, नंदा जगनाडे, लता झलके यांच्या सोबतच गावातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी परिचर देविदास बोंद्रे, पुरुषोत्तम बोंद्रे, शालू कठाणे, प्रकाश फटे यांनी सहकार्य केले.