दुसऱ्यांचे दु:ख ओळखणे हाच बौद्ध धर्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 09:25 PM2019-02-08T21:25:28+5:302019-02-08T21:25:44+5:30
जीवनात शेकडो लढाया जिंकण्यापेक्षा तुम्ही स्वत:वर विजय प्राप्त करणे शिका. नंतर नेहमी विजय तुमचाच होईल.त्यामुळे जीवन मंगलमय होईल. दुसऱ्याचे दु:ख ओळखून जीवन जगणे हाच बौध्द धर्माचा खरा उपदेश आहे, असे विचार पत्र्त्रा मेत्ता संघ जपान कमेटीचे अध्यक्ष भदंत खोशो तानी यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : जीवनात शेकडो लढाया जिंकण्यापेक्षा तुम्ही स्वत:वर विजय प्राप्त करणे शिका. नंतर नेहमी विजय तुमचाच होईल.त्यामुळे जीवन मंगलमय होईल. दुसऱ्याचे दु:ख ओळखून जीवन जगणे हाच बौध्द धर्माचा खरा उपदेश आहे, असे विचार पत्र्त्रा मेत्ता संघ जपान कमेटीचे अध्यक्ष भदंत खोशो तानी यांनी केले.
महासमाधीभुमी महास्तूप रुयाड (सिंदपूरी) चा १२ वा पत्र्त्रा मेत्ता बालसदनचा २४ वा व वाचनालयाच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त महासमाधीभूमी महास्तुप रुयाड (सिंदपूरी) येथे आयोजित ३२ व्या धम्म महोत्सवाचे उद्घाटन करताना धम्मपिठावरुन ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी पत्र्त्रा मेत्ता संघाचे अध्यक्ष धम्मदुत भदंत संघरत्न मानके होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात संघरत्न मानके यांनी सांगितले की, पत्र्त्रा मेत्ता संघाचे कार्य १९८२ मध्ये सुरु होवून सध्या देशातील अनेक राज्यात व नेपाळमध्ये कार्य सुरु आहे. संघाच्या सम्यक कार्यामुळे सुरवातीच्या काळापासून जनतेचे सहकार्य मिळत आहे. महासमाधी महास्तूप हा भारत व जपानच्या मैत्रीचा प्रतीक ठरला आहे. अ.भा. भिक्कू संघाचे अनुशासक भदंत सदानंद महस्थवीर विशेष अतिथी होते.
याप्रसंगी जपानचे तेंदाई संघाचे माजी अध्यक्ष भदंत योको निशिओका, खाजुगांची विहाराचे भदंत खोदो कोंदो, भदंत तोमोयोरीदेगुची, होतगोरीजी विहाराच्या विहाराधीपती भिक्कुनी म्योजिच्छु नागाकुबो, गोठणगाव तिबेटी कॅम्पचे भदंत लोबझान तेंबा व भदंत गेशे शेरिंग, भदंत सत्यशील, भदंत डॉ. धम्मदीप, भदंत महापंथ, भदंत प्रियदर्शी, भदंत बुध्दघोष, भदंत मेत्तानंद, भदंत नगासेन, भदंत डॉ. ज्ञानदीप, भदंत नागदिवाकर, भिक्षुणी विशाखा, भिक्खुनी शिलाचारा, भिक्कुनी कात्यायणी आदी उपस्थित होते.
ओरीसाचे माजी आमदार कृष्णचंद सागरीया, रुयाडच्या सरपंच माधुरी पचारे, सिदंपुरीच्या सरपंच भाग्यश्री येलमुले, मिलिंद फुलझेले आदी उपस्थित होते. सकाळी निलज फाट्यावर बौध्द भिक्खूंचे स्वागत करुन धम्मरॅलीचे पवनी शहरात आगमन होताच शहरवासीयांनी स्वागत केले. शहरातून डॉ. आंबेडकर चौकात डॉ. बाबासाहेबांच्या व भगवान गौतम बुध्दांच्या प्रतीमांना माल्यार्पण करण्यात आले.
रुयाडच्या सम्राट अशोक बुध्द विहारापासून सिंदपूरीच्या बौध्दांकुर विहार होवून महासमाधीभूमी महास्तूपापर्यंत धम्मरॅली काढण्यात आली. महास्तुपात भारतीय, जपानी, तिबेटी पध्दतीने विधिवत पूजन करण्यात आले.
अखिल भारतीय भिक्खू संघाचे संघानुशासक भदंत सदानंद महास्थवीर म्हणाले, मी मुळ पवनी तालुक्यातील आहे. दरवर्षी या महास्तुपातील गर्दी बघुन गदगद झाल्यासारखे वाटते. हा महास्तुप येणाºया दिवसात दिशा देणारा ठरेल.
याप्रसंगी पत्र्त्रा पिठक पुरस्कार भदंत श्रध्दातीरस, खेमा सागरीया, मेत्ता पिठक पुरस्कार हरीश जानोरकर, पुष्पाबौध्द, कृष्णचंद सागरीया, ग्रामपंचायत रुयाड व सिंदपूरी, पवनी पत्रकार संघ समता सैनिक दल, अनील मानके, जगदीश खोब्रागडे, संदपी नेगी, सिकंदर नेगी यांना देवून सन्मानित करण्यात आले.
पत्र्त्रा मेत्ता बालसदन व पत्र्त्रा मेत्ता स्कुल नागपूरच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गाऊन बुध्द भिम गितांवर नृत्य प्रस्तूत केले. प्रास्ताविक धम्मानंद मेश्राम, संचालन अॅड. महेंद्र गोस्वामी, प्रकुष्ठ वाघमारे व आभार प्रदर्शन अॅउ. गौतम उके यांनी केले. दुपारपर्यंत दोन ते अडीच लाखापर्यंत उपासक उपासीकांनी उपस्थिती लावली होती. संपुर्ण वातावरण बौध्दमय झाले होते. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी मनोहर मेश्राम ब्रम्ही, शिलरत्न कवाडे, अरवींद धारगावे, शिलमजू सिंहगडे, जयसर दहिवले, करुणा टेंभुर्णे, गजेंद्र गजभिये, संजय घोडके, श्रीकांत सहारे, जयराज नाईक, गौतम उके, भदंत धम्मतप, भदंत पेंबा नोरबू, अरुण गोंडाणे आदीनी परिश्रम घेतले. व्यवस्था ठेवण्याचे काम समता सैनिक दलाने सहकार्य केले.