२ एकरात २.५० लाखांचे विक्रमी उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2017 12:24 AM2017-07-02T00:24:41+5:302017-07-02T00:24:41+5:30

शहराकडे धाव न घेता खेड्यातच काही नवीन करण्याची उमेद बाळगून काळ्या मातीत खपत परंपरागत उत्पादनाला नवीन तंत्रज्ञानाची जोड देत ....

Record of 2.50 lakh acre in 2 acre | २ एकरात २.५० लाखांचे विक्रमी उत्पादन

२ एकरात २.५० लाखांचे विक्रमी उत्पादन

Next

चवळी शेंगांचे पीक : प्रगत शेतकरी वीरेंद्र मदनकर, धानाला उत्तम पर्याय
मुखरू बागडे। लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : शहराकडे धाव न घेता खेड्यातच काही नवीन करण्याची उमेद बाळगून काळ्या मातीत खपत परंपरागत उत्पादनाला नवीन तंत्रज्ञानाची जोड देत कमी खर्चात अधिक उत्पादनाची किमया पालांदुरातील विरेंद्र मदनकर यांनी करून दाखविली आहे.
शेती परवतडत नसल्याचे बोंब सगळीकडूनच कानावर ऐकू येताना दिसते. मात्र काही तरूण जोखीम पत्करत कृषी क्षेत्रात झालेले नवीन बदल स्विकारत काळ्या मातीतून बाजारात काय व केव्हा कसे विकणे याचा नजरअंदाज, अभ्यास घेत पिकपद्धत बदलवितात. याच सुत्राने विरू मदनकरने धान पिक कमी करू मागील ३ वर्षापासून बागायतीत शेंगाचे उत्पादन घेणे आरंभ केले. याकरीता मंगे घोडके व त्यांची टिम सदोचित नवीन अभ्यासासह शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनात अग्रेसर आहेत. पालांदुरातील मंडळ कृषी कार्यालयामार्फत परिसरात विविध भाज्यांचे प्रात्यक्षिके दाखवून शेतकऱ्यांना शहाणे करणे सुरू आहे. बराचदा प्रोत्साहन निधी म्हणून वांगे, भेंडी उत्पादकांना याच कार्यालयामार्फत अनुदान दिल्या गेले हे येथे उल्लेखनीय.
हल्ली विरू मदनकरच्या शेतात ३०-४० मजूर श्रम उपसत ४००-५०० चपकी चे उत्पादन सुरू आहे. मागील ४० दिवसापासून उत्पादन सुरू आहे. २० ते ४५ रूपये एवढा भाव भंडारा येथील मंडीत मिळत आहे. बंडू बारापात्रे यांचया प्रामाणिकतेने पालांदूर परिसरातील बागायती उत्पादकांना मोठा आधार मिळला असून रोजच नव नवे शेतकरी भंडाऱ्याला माल विक्रीला नेतात. विक्रीला अडचण नसल्याने शेतकरी तिथे माल विकणे पसंद करीत आहे. नगदी रक्कम हातात मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहे.
चुलबंधच्या खोऱ्यात पाण्याची पातळी खूपच खोल गेल्याने अधिक जागेत धान पिक घेणे अवघड झाले आहे. जमिन आहे पण पाणी कमी झाल्याने बागायतीला पसंती वाढली आहे. स्थानिक बाजारात लहान व्यापारी माल विकत घेतात परंतू पैसेच देत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी मुस्कुटदाबी होत असते. यामुळे हक्काची बाजारपेठ म्हणून बीटीबी मंडीला अधिक महत्त्व आले आहे. मोठा पाऊस येईपर्यंत चवळी शेंग उत्पादन देतच राहणार असून हपत्याच्या सातही दिवस माल तोडणे सुरू आहे. सकाळच्या सत्रात दोन तासात मजुराकडून माल तोडून १० वाजेपर्यंत मंडिला माल पोहचविला जातो. नागपूर, वर्धा, बुटीबोरी, उमरेड भीसी व संपूर्ण भंडाऱ्या जिल्ह्यात मंडीतून माल विकल्या जात आहे. मोठ्या शेतकऱ्यांनी धानपिकाला उत्तम पर्याय म्हणून बागायतीकडे वळून वांगे, भेंडी, चवळी, कोबी, कोहळा आदी पिकाकडे वळून कमी पाण्यात अधिक उत्पादनाची आस धरावी व विरेंद्र मदनकरचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन शेती कसावी.

Web Title: Record of 2.50 lakh acre in 2 acre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.