भंडारात विक्रमी 78 व्यक्तींचे प्लाझ्मा दान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 05:00 AM2020-12-19T05:00:00+5:302020-12-19T05:00:52+5:30
जिल्ह्यात काेराेना रुग्णांच्या संख्येत घट हाेत असली तरी गंभीर परिस्थितीत अनेक रुग्ण आहेत. अशा रुग्णांना इतर औषधीसाेबतच प्लाझ्मा उपयुक्त ठरत आहे. प्लाझ्मा दिलेल्या रुग्णांमध्ये उपचाराला प्रतिसाद देण्याची क्षमता वाढत आहे. त्यासाठीच काेराेनामुक्त झालेल्या व्यक्तींचा प्लाझ्मा काेराेनाबाधितांना दिला जात आहे. मात्र भंडारासारख्या शहरात प्लाझ्मा मिळणे जिकरीचे काम हाेते. रुग्णांच्या नातेवाईकांना नागपूरशी संपर्क साधून प्लाझ्मा मिळवावा लागत हाेता.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : काेराेना संसर्गात गंभीर रुग्णाला आवश्यक प्लाझ्मा उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयाेजित शिबिरात तब्बल ७८ व्यक्तींनी आपला प्लाझ्मा दान केला. राज्यातील आतापर्यंतचे सर्वात माेठे शिबिर म्हणून याची नाेंद झाली आहे. या शिबिरात जिल्हाधिकाऱ्यांनी रक्तदान तर अपर जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्लाझ्मा दान केले. संकलीत झालेला प्लाझ्मा गरजू रुग्णांना माेफत दिला जाणार आहे.
जिल्ह्यात काेराेना रुग्णांच्या संख्येत घट हाेत असली तरी गंभीर परिस्थितीत अनेक रुग्ण आहेत. अशा रुग्णांना इतर औषधीसाेबतच प्लाझ्मा उपयुक्त ठरत आहे. प्लाझ्मा दिलेल्या रुग्णांमध्ये उपचाराला प्रतिसाद देण्याची क्षमता वाढत आहे. त्यासाठीच काेराेनामुक्त झालेल्या व्यक्तींचा प्लाझ्मा काेराेनाबाधितांना दिला जात आहे. मात्र भंडारासारख्या शहरात प्लाझ्मा मिळणे जिकरीचे काम हाेते. रुग्णांच्या नातेवाईकांना नागपूरशी संपर्क साधून प्लाझ्मा मिळवावा लागत हाेता. जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी परिस्थितीचे गांभिर्य ओळखून शिबिर आयाेजित केले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात तीन दिवसीय शिबिरात १४७ अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी नाेंदणी केली. आरबीडी व ॲन्टीबाॅडी तपासणीनंतर शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ६० व्यक्तींचा प्लाझ्मा स्विकारण्यात आला असून १८ जण प्लाझ्मासाठी पात्र ठरले आहे. त्यांचा प्लाझ्मा शनिवारी घेण्यात येणार आहे.
जिल्हा प्रशासनाच्या या उपक्रमाची आमदार नरेंद्र भाेंडेकर यांनी प्रशंसा केली. काेराेना हाेवून गेलेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान करावे, असे आवाहन केले. शिबिराच्या पहिल्या दिवशी ११६, दुसऱ्या दिवशी सहा आणि तिसऱ्या दिवशी २५ लाेकांनी तपासणीसाठी नाेंदणी केली. यात पात्र ठरलेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान केला. विशेष म्हणजे या शिबिरात जिल्हाधिकारी संदीप कदम तर अपर जिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर यांनी प्लाझ्मा दान केला. जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घेतल्याने यात सर्वांन उत्स्फूर्त सहभाग नाेंदविला. संपूर्ण राज्यात सर्वात माेठे प्लाझ्मा दान शिबिर असल्याचे लाईफलाईन ब्लड बॅंकेचे डाॅ. हरिश वर्धे यांनी सांगितले. प्लाझ्माच्या माध्यमातून भंडाराने विक्रम नाेंदविला.
गरजू रुग्णांना मिळणार माेफत प्लाझ्मा
काेराेना रुग्णांसाठी संजिवनी ठरणारा प्लाझ्मा भंडारा येथे संकलीत करण्यात आला. अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आता हा प्लाझ्मा शासकीय रुग्णालयात गरजू रुग्णांना माेफत देण्यात येणार आहे. अशा प्रकारचे प्लाझ्मा दान शिबिर यापुढेही आयाेजित करण्याचा मानस असल्याचे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी सांगितले. या शिबिरातून काेराेना बाधितांना दिलासा मिळेल.