साकाेली व पवनी तालुक्यात अतिवृष्टीची नाेंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:39 AM2021-09-05T04:39:46+5:302021-09-05T04:39:46+5:30

बाॅक्स सरासरीच्या ७७ टक्के पाऊस जिल्ह्यात १ जून ते ४ सप्टेंबर या कालावधीत १०८२.३ मि.मी. पाऊस अपेक्षित असताे. या ...

Record of heavy rains in Sakali and Pawani talukas | साकाेली व पवनी तालुक्यात अतिवृष्टीची नाेंद

साकाेली व पवनी तालुक्यात अतिवृष्टीची नाेंद

Next

बाॅक्स

सरासरीच्या ७७ टक्के पाऊस

जिल्ह्यात १ जून ते ४ सप्टेंबर या कालावधीत १०८२.३ मि.मी. पाऊस अपेक्षित असताे. या कालावधीत ८३५.९ मि.मी. पावसाची नाेंद झाली असून सरासरीच्या ७७ टक्के आहे. गतवर्षी याच कालावधीत १०९२.३ मि.मी., पावसाची नाेंद झाली हाेती. महापुराचाही फटका बसला हाेता. मात्र यावर्षी पावसाने दडी मारल्याने सरासरी पाऊस कमी झाला आहे.

बाॅक्स

गाेसे प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले

पवनी तालुक्यातील गाेसेखुर्द प्रकल्पाचे पाच दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून ५६०.६ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सध्या या प्रकल्पात पाण्याची पातळी २४४ मीटर असून आतापर्यंत प्रकल्पाच्या पाणलाेट क्षेत्रात ५०६.६ मि.मी., पावसाची नाेंद करण्यात आली आहे. संभाव्य पुरावा धाेका लक्षात घेता यावर्षी सुरुवातीपासूनच प्रकल्पात नियंत्रित पाणी ठेवले जात आहे.

Web Title: Record of heavy rains in Sakali and Pawani talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.