आता तात्पुरती होणार शिक्षकांची नियुक्ती
By admin | Published: December 27, 2014 01:10 AM2014-12-27T01:10:48+5:302014-12-27T01:10:48+5:30
जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांचे पदे रिक्त आहेत. त्या रिक्त पदावर तात्पुरत्या स्वरूपात शिक्षकांची नियुक्ती करण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला दिले आहे.
मोहाडी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांचे पदे रिक्त आहेत. त्या रिक्त पदावर तात्पुरत्या स्वरूपात शिक्षकांची नियुक्ती करण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला दिले आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये ही बाब जिल्हा परिषदेला उशिरा कळली. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेत अनेक पदे रिक्त आहेत. माहोडी तालुक्यात पदवीधर शिक्षकांचे ३६ पदे रिक्त आहेत. या रिक्त शिक्षकांची जिल्हा परिषदेने नियुक्ती केलेली नाही. मोहाडी तालुक्यात विशेषत: इंग्रजी, विज्ञान व गणित विषयांच्या शिक्षकांची गरज आहे. आरटीई कायद्यानुसार इयत्ता सहावी ते आठवी करीता बीएससीबीए किंवा बीएबीएड शिक्षक हवे आहेत.
सहावी ते आठवीला बीएससी शिकविणाऱ्या शिक्षकांची मोहाडी तालुक्यात संख्या केवळ चार आहे. यामुळे विशेषत: गणित व विज्ञान विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान अधिकच होत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा सर्वांगिण गुणवत्तेत कमी पडत असल्याचे उशिरा पदाधिकाऱ्यांना समजले. जिल्हा परिषदेवर भार न ठेवता शाळा व्यवस्थापन समितीने आता तात्पूरत्या स्वरूपात रिक्त असलेल्या जागेवर शिक्षकांची नेमणूक करावी, असे पत्र शिक्षणाधिकारी (प्राथमिक ) यांनी १७ डिसेंबर रोजी पत्र काढले. शाळा व्यवस्थापन समितीला नेमणूक करण्याच्या अधिकारावर निर्णय २१ आॅक्टोबर रोजी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे.
इयत्ता ६ ते ८ वर ज्या विषयाची जागा रिक्त आहे त्या विषयाचेच शिखक तात्पुरत्या ३००० हजार रूपये प्रतिमाह मानधनावर नियुक्त केले जातील. या शिखकांची नियुक्ती ३० दिवस किंवा नियमित शिक्षकांची पदस्थापना होईपर्यंत होणार आहे. पद रिक्त असल्यास कामाच्या दिवशी पुरेसा खंड देवून पुन्हा नव्याने नियुक्ती शाळा समितीला करता येणार आहे. (तालुका प्रतिनिधी)