राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्पात रेड अलर्ट
By admin | Published: March 7, 2017 12:27 AM2017-03-07T00:27:51+5:302017-03-07T00:27:51+5:30
मार्च ते मे या उन्हाळ्याच्या तीन महिन्यामध्ये वाघांची शिकार होण्याची भिती केंद्रीय वन्यजीव गुन्हे अन्वेषण विभागाने व्यक्त केली आहे.
केंद्रीय वन्यजीव अन्वेषण विभागाने वर्तविली शिकारीची शक्यता
संजय साठवणे साकोली
मार्च ते मे या उन्हाळ्याच्या तीन महिन्यामध्ये वाघांची शिकार होण्याची भिती केंद्रीय वन्यजीव गुन्हे अन्वेषण विभागाने व्यक्त केली आहे. त्या अनुषंगाने राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्पात रेड अलर्ट जारी करण्यात आला असून वनकर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचा सूचना देण्यात आलेल्या आहेत.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाघांना धोका निर्माण झाल्याचे केंद्रीय वन्यजीव गुन्हे अन्वेषण विभागाने मागील आठवड्यात कळविले आहेत. त्यानुसार केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने देशातील सर्वच व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालकांचा वाघाचे संरक्षण आणि संवर्धनासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट, चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा, नागपूर जिल्ह्यातील पेंच, वर्धा जिल्ह्यातील बोर, गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध व नागझिरा या सहा व्याघ ्रप्रकल्पात रेड अलर्ट जारी करण्यात आले आहे. तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्च ते मे या तीन महिन्यात सतत गस्त, सिमेवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
उन्हाळ्यात वाघांची पाण्यासाठी भटकंती होऊ नये यासाठी कृत्रिम पाणवठे तयार करण्यात यावे, स्थानिकांच्या हालचालीवर करडी नजर ठेवताना व्याघ्र प्रकल्पाच्या सिमेलगतच्या गावात अनोळखी व्यक्ती निदर्शनास आल्यास त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गत पाच वर्षातील उन्हाळ्यात जंगलाना आगी लागुन मोठ्या प्रमाणात वनसंपदा नष्ट झाली असून वन्यप्राणीही ध्जावले आहेत. यावेळी उन्हाळ्यात जंगलात तस्करांकडून जंगलांना आगी लावणे, सापळा रचून वन्यपशुची शिकार करणे, पाणवठ्यावर विषप्रयोग करण्ो, ट्रपद्वारे वाघांची हत्या करणे, आदिचे प्रमाण होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.