लाल पाण्याचा जीवघेणा खेळ

By admin | Published: July 10, 2017 12:14 AM2017-07-10T00:14:08+5:302017-07-10T00:14:08+5:30

भंडारेकरांना दूषित पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. मागील तीन दिवसांपासून नगर पालिका प्रशासनाकरवी वितरित ....

Red-water fatal game | लाल पाण्याचा जीवघेणा खेळ

लाल पाण्याचा जीवघेणा खेळ

Next

पालिकेची उदासीनता : नागरिक पिताहेत दूषित पाणी
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :भंडारेकरांना दूषित पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. मागील तीन दिवसांपासून नगर पालिका प्रशासनाकरवी वितरित करण्यात येणारे पिण्याचे पाणी लाल स्वरुपात येत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
दीड लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या भंडारा शहरात पाणी पुरवठ्याची जबाबदारी नगर पालिका प्रशासनावर आहे. जवळपास पाच दशकांपूर्वीची जीर्ण झालेल्या नळयोजनेच्या मार्फत शहरात पाणीपुरवठा केला जातो. बहुतांश जागाहून पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी लिकेज झाल्याने आधीच शहरवासीयांना दूषीत पाणीपुरवठा होत होता. यात पुन्हा नवीन बाब समोर आली आहे.
भंडारा पाणीपुरवठ्याचे मुख्य स्त्रोत असलेल्या वैनगंगा नदीच्या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गाळ निर्माण झाली आहे. परिणामी पाणी गढूळ झाल्याने तव्दतच जलशुध्दीकरण यंत्रणा नावापुरतीच उरल्याने मागील तीन दिवसांपासून शहरवासीयांना लाल रंगाच्या गढूळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. दुसरीकडे मध्यप्रदेश सीमावर्ती भागात पाऊस झाल्याने वैनगंगेच्या नदीपात्रात पावसाचा पाण्याचा शिरकाव झाला आहे. इकॉर्निया या जलपर्णी वनस्पतीचा विळखा वैनगंगा नदीपात्रात आहे. यात गाळामुळे समस्येत अधिकच भर पडली आहे.
शहरात दहा हजारांपेक्षा जास्त नळधारक असून ३५० पेक्षा अधिक सार्वजनिक नळ आहेत. या नळधारकांना पिण्याच्या पाण्याचा अशुद्ध पुरवठा होत असल्याने अनेकांनी नळाचे पाणी पिणे सोडून दिले आहे.
आधी वीज पुरवठा खंडित होत असल्याने पाणी येत होते. आता वीज पुरवठा खंडित होत नसला तरी पाणी येण्याचे प्रमाण काही प्रमाणात योग्य असले तरी ते अत्यंत दूषित असल्याने भंडारावासीयांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा आमच्या आरोग्याशी खेळ असल्याची भावना जनतेने व्यक्त केली आहे.

आजार बळावण्याची भीती
दूषित पाण्यामुळे अतिसार, कावीळ, हैजा यासारखे आजार बळावण्याची भिती व्यक्त केली जात आहे. पावसाने पाठ फिरविल्यामुळे तलावांसह विहिरींच्या पातळीत पुन्हा घट होत आहे. दुसरीकडे नगरपालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अजूनपर्यंत पाणीपुरवठ्याचा भविष्यकालीन प्रस्ताव अंमलात येण्यास बराच कालावधी शिल्लक आहे.

Web Title: Red-water fatal game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.