घरगुती गॅसची दरवाढ कमी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:31 AM2021-02-15T04:31:29+5:302021-02-15T04:31:29+5:30
ग्रामीण व शहरी भागातील शेतकरी शेतमजूर, गोरगरीब, शोषित-पीडित महिलांना मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा चालवावा लागतो. रोजगारासाठी वणवण भटकावे लागत ...
ग्रामीण व शहरी भागातील शेतकरी शेतमजूर, गोरगरीब, शोषित-पीडित महिलांना मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा चालवावा लागतो. रोजगारासाठी वणवण भटकावे लागत असून रोजगार मिळत नसल्याने महिला आर्थिक संकटात सापडल्या आहेत. तर केंद्र सरकार जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढवीत असल्याने महागाईने दरवाढीचा उच्चांक गाठला आहे. घरगुती गॅस सिलिंडर ७८०.५०रुपये, तर पेट्रोल ९४.३६ रुपये आणि डिझेल ८४.९४ रुपये प्रति लिटर झाले आहे. याबाबत केंद्र सरकारने वेळीच दखल घेऊन घरगुती गॅस सिलिंडरची दरवाढ तात्काळ कमी करावी, अशी मागणी भंडारा जिल्हा भीमशक्ती महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्ष अरुणा दामले, उपाध्यक्ष पपिता वंजारी, महासचिव रूपा लेंधारे, विभा रामटेके, माधुरी सुखदेवे, सुमन वंजारी, संघमित्रा गेडाम, प्रमिला बोरकर, शर्मिला बोरकर, विशाखा बनसोड, मंदा मेश्राम, सरिता टेंभुर्णे, वनमाला बोरकर, इंदू बारसागडे, लक्ष्मी मेश्राम, मनीषा मेश्राम, संयोगिता खोब्रागडे यांनी केली आहे.