पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर व रासायनिक खतांची दरवाढ कमी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:35 AM2021-05-26T04:35:00+5:302021-05-26T04:35:00+5:30
लाखांदूर : खरीप हंगामांतर्गत शेती मशागतीची कामे सुरू झाली असून, आधुनिक पद्धतीने शेती मशागतीची कामे करताना पेट्रोल-डिझेलची व खतांची ...
लाखांदूर : खरीप हंगामांतर्गत शेती मशागतीची कामे सुरू झाली असून, आधुनिक पद्धतीने शेती मशागतीची कामे करताना पेट्रोल-डिझेलची व खतांची वाढलेली किंमत शेतकऱ्यांना परवडणारी नसल्याने शासनाने पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर व रासायनिक खतांची दरवाढ कमी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन २५ मे रोजी तहसीलदारांमार्फत पंतप्रधानांना पाठविण्यात आले आहे.
लाखांदूर तालुक्यातील जनता पूर्णत: शेतीवर अवलंबून आहे. येथील बहुतेक नागरिक मुख्यत: शेतीवरच अवलंबून आहेत. सदर शेतात लागवडीअंतर्गत खरिपात धान, तर रबीअंतर्गत कडधान्ये व सिंचन सुविधा उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी उन्हाळी धान पिकाची लागवड केली जाते.
गतवर्षी खरीप हंगामात लागवडीखालील धान पिकाला पूर, कीडरोग यासारख्या कारणाने मोठ्या प्रमाणात फटका बसला होता, तर उन्हाळी हंगामात लागवडीखालील धान पिकाला गारपीट व पावसाने झोडपले असून, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना नव्या उमेदीने शेतकरी कामाला लागले असतानाच शासनाकडून पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर व रासायनिक खतांची दरवाढ करण्यात आल्याने तालुक्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर व रासायनिक खतांची दरवाढ कमी करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
सदर मागणीचे निवेदन लाखांदूरचे तहसीलदार अखिल भारत मेश्राम यांना देताना सरिता फुंडे, तालुका राकाँ पार्टीचे अध्यक्ष बालू चुन्ने, शहर अध्यक्ष ॲड. मोहन राऊत, मिलिंद डोंगरे, देवीदास राऊत, देवानंद नागदेवे, सुभाष दिवठे, संजय नहाले, रेशीम परशुरामकर, मंगेश ब्राह्मणकर, रजनीकांत खंडारे, मानबिंदी दहीवले, सूरज मेंढे, डॉ. खुशाल मोहरकर यांच्यासह अन्य महिला, पुरुष, नागरिक उपस्थित होते.
===Photopath===
250521\img20210525131045.jpg
===Caption===
पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडर व रासायनिक खतांची दरवाढ कमी करण्यासाठी निवेदन देतांना तालुका राकॉ चे कार्यकर्ते