पेट्रोल, डिझेल, गॅससह खतांच्या किमती कमी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:27 AM2021-05-30T04:27:53+5:302021-05-30T04:27:53+5:30
पेट्रोल, डिझेलची दरवाढ शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी आहे. खरीप हंगामात मशागतीसाठी शेती अवजारांना डिझेलची आवश्यकता असते. डिझेलच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांची मोठी ...
पेट्रोल, डिझेलची दरवाढ शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी आहे. खरीप हंगामात मशागतीसाठी शेती अवजारांना डिझेलची आवश्यकता असते. डिझेलच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांची मोठी दमछाक होत आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागतो. कर्जबाजारी होऊन शेती करावी लागत आहे. अपेक्षित उत्पादन होत नसल्याने शेतकरी पुरता हतबल झाल्याने केंद्र शासनाने वाढलेल्या पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी कराव्यात. गॅस आणि खतांच्या किमतीत देखील झालेली वाढ चिंतनीय असून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारी आहे. दरवाढ त्वरित मागे घेण्याची मागणी निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. निवेदन देताना राष्ट्रवादी काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष लोमेश वैद्य, शहर अध्यक्ष यादव भोगे, माजी नगराध्यक्ष मुकेश बावनकर, राज्य महासचिव सुनंदा मुंडले, माजी नगराध्यक्षा रजनी मोटघरे, पुष्पा भुरे, सुरेश सावरबांधे, राहुल काटेखाये, नगरसेविका शोभना गौरशेट्टीवार, माजी पंचायत समिती सदस्य शैलेश मयूर, शुभम रामटेके,राजेश्वर सामृतवार, छोटू बाळबुद्धे, गोलू अलोने, विशाखा भुरे, चेतक डोंगरे, मनोज कोवासे इत्यादी उपस्थित होते.