प्रसूतीसाठी ‘रेफर टू तुमसर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:05 AM2021-02-06T05:05:58+5:302021-02-06T05:05:58+5:30
तालुक्यातील देव्हाडी तथा आसपासच्या दहा ते पंधरा गावांतील नागरिकांसाठी देव्हाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र सुसज्ज ...
तालुक्यातील देव्हाडी तथा आसपासच्या दहा ते पंधरा गावांतील नागरिकांसाठी देव्हाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र सुसज्ज असून, मोठी इमारत आहे. कर्मचाऱ्यांची संख्याही येथे आहे. प्रथम, दुसऱ्या, वयस्क महिलांची प्रसूती येथे करण्यात येते. परंतु महिलांची स्थिती नाजूक असल्यास त्यांना प्रसूतीसाठी तुमसर येथे रेफर काढण्यात येते. या महिलांची सुविधा देव्हाडी येथे व्हावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आलम खान व मोरेश्वर ठवकर यांनी केली आहे. महिलांच्या जिवाला धोका निर्माण होऊ नये, याकरिता डॉक्टर येथे ‘रेफर टू तुमसर’चा निर्णय घेतात. प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्व सुविधा उपलब्ध झाल्यास रेफर टू तुमसरपासून सुटका होऊ शकते, याकरिता जिल्हा परिषद प्रशासनाने दखल घेण्याची गरज आहे.