रिफाईंड तेलाने वाढते चरबी; घाणा तेलाची मागणी कमीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:42 AM2021-08-18T04:42:37+5:302021-08-18T04:42:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : आधुनिक जीवनशैलीत अनेक बदल घडत आहेत. यात आहारातील प्रमुख पदार्थ असलेल्या तेलाबाबतही घडत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आधुनिक जीवनशैलीत अनेक बदल घडत आहेत. यात आहारातील प्रमुख पदार्थ असलेल्या तेलाबाबतही घडत आहे. नैसर्गिक तेलाचा म्हणजेच कच्या घाणीच्या तेलाऐवजी रिफाईंड तेलाची मागणी अलीकडे चांगलीच वाढली आहे. मात्र रिफाईंड तेल तयार करताना वापरल्या जाणाऱ्या रसायनांमुळे मानवी आरोग्यालाही धोका उत्पन्न झाला आहे. परिणामी रुग्ण संख्याही वाढत असून आहारतज्ज्ञ मात्र तेल आणि मीठ कमी खावे, असा आरोग्यमय सल्लाही देत आहेत.
बॉक्स
म्हणून वाढत आहेत हृदयरोगी
रिफाईंड तेलाने खाल्याने शरीरातील उष्णता वाढत असते. वेळप्रसंगी रुग्णाच्या शरीरात चरबीचेही प्रमाण दिसून येते. या प्रसंगी तेलाचा वापर कमी करणे अत्यंत आवश्यक बाब आहे. रुग्णही वाढत आहे.
बॉक्स
लाकडी घाण्याचा तेलाचा पर्याय
पूर्वीच्या काळी घाणीचे तेल मोठ्या प्रमाणात वापरायचे. आताही घाणीचे तेल मिळते. मात्र ते महाग असल्याने त्याचा वापर कमी झाला आहे. पण घाणीच्या तेलाची मागणीही कमीच दिसून येते.
बॉक्स
रिफाईंड तेल घातक का?
रिफाईंड तेलाच्या उत्पादन प्रसंगी अनेक रसायनांचा वापर केला जातो. या रसायनांचा परिणाम मानवी शरीरावर होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच रिफाईंड तेल घातक असल्याचे सांगण्यात येते.
कोट
रिफाईंड तेल तयार करताना रसायनांचा वापर होतो. परिणामी त्याचा फरक मानवी शरीरावर होत असल्याने उष्णता वाढते. आरोग्याला धोका असल्याने तेलाचा वापर खाण्यात कमी करावा.
- डॉ. मनोज चव्हाण, भंडारा