खातेदारांचे पैसे ताबडतोब परत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:40 AM2021-09-23T04:40:25+5:302021-09-23T04:40:25+5:30
भंडारा : बँकेच्या अभिकर्त्याने दीड कोटीचा अपहार करून खातेदारांचे पैसे काढून घेतले. खातेदार यामुळे अडचणीत आले आहेत. याला बँक ...
भंडारा : बँकेच्या अभिकर्त्याने दीड कोटीचा अपहार करून खातेदारांचे पैसे काढून घेतले. खातेदार यामुळे अडचणीत आले आहेत. याला बँक प्रशासन पूर्णपणे दोषी आहे. बँक प्रशासनाचा दोष स्पष्ट करणारा अहवाल तयार करून शक्य तितक्या लवकर खातेदारांना व्याजासह पैसे परत करण्याचे निर्देश खासदार सुनील मेंढे यांनी आज दिले. आसगाव येथील सेंट्रल बँकेच्या शाखेतील एका अभिकर्त्याने जवळपास दीड कोटी रुपयांचा अपहार करून बँकेचे खातेदार ग्राहकांना गंडविण्याचा प्रयत्न केला. त्याने परस्पर ग्राहकांच्या खात्यातून पैसे काढून घेण्याचा प्रताप केला.
या संदर्भात खासदार सुनील मेंढे यांच्याकडे ग्राहकांनी लेखी स्वरूपात तक्रार केल्यानंतर खासदार मेंढे यांनी प्रत्यक्ष बँकेच्या शाखेत भेट देत वस्तुस्थिती जाणून घेतली. शाखा व्यवस्थापकांशी चर्चा केल्यानंतर खासदारांनी विभागीय व्यवस्थापक आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांशी दूरध्वनीवरून चर्चा केली.
चूक बँक व्यवस्थापनाची आणि बँकेच्या अधिकृत अभिकर्त्याची आहे. त्यामुळे त्याच्या आशयाचा अहवाल तयार करून ज्यांच्या खात्यातील पैशांचा अपहार झाला आहे, त्यांना त्यांच्या पासबुकचा अभ्यास करून व्याजासह शक्य तितक्या लवकर पैसे परत करण्याच्या दृष्टीने कारवाई करावी, असे निर्देश यावेळी खासदारांनी दिले. खासदारांच्या भेटीने त्यामुळे अडचणीत आलेल्या अनेक ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. याप्रसंगी अनिल मेंढे, भाजप पवनी शहराध्यक्ष मोहन सूरकर, आसगावचे सरपंच विपिन बोरकर, प्रकाश कुर्झेकर, हिरा वैद्य, युवा मोर्चाचे अमोल उराडे, शिवा मुंगाटे, धनंजय मुंडेले, ॲड. खेमराज जिभकाटे, प्रमोद मेंढे, संदीप नंदरधने, संजय रत्नपारखी, बंडू जांभूळकर, श्रीपत मरघडे, सरपंच शेंद्री, परशुराम समरीत, लोकेश दळवे, दीपक तिघरे, देवानंद खोपे, ॲड. विनायक फुंडे, डॉ. प्रमोद खरकाटे, दीपक कोरे, नेहाल देशमुख, तुळशीराम बिलवने, लीलाधर रेवतकर, विकास जांभूळकर, राहुल खोब्रागडे, प्रवीण वालदे, रवी जांभूळकर, हरिश्चंद्र भेंडारकर, महेश पुंडे, सोनू भाजीपाले, मोहन कुर्झेकर, राजू भेंडारकर, किरण डोये आदी उपस्थित होते.