घड्याळी तासिका शिक्षकाचा उत्तरपत्रिका तपासण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 04:38 PM2023-04-01T16:38:06+5:302023-04-01T16:38:18+5:30

परीक्षा आटोपताच बोर्डाचे पेपर तपासणीसाठी नियमित शिक्षकांसह घड्याळी तासिका शिक्षकांना पेपरचे गठ्ठे पाठविण्यात आले.

Refusal to check answer sheet of clockwork teacher in bhandara | घड्याळी तासिका शिक्षकाचा उत्तरपत्रिका तपासण्यास नकार

घड्याळी तासिका शिक्षकाचा उत्तरपत्रिका तपासण्यास नकार

googlenewsNext

गोपालकृष्ण मांडवकर

भंडारा : यंदाचे शैक्षणिक सत्र संपण्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने घड्याळी तासिका शिक्षकांचे सेवा समाप्तीचे आदेश निघाल्याने जिल्हा परिषदेच्या एका शिक्षकाने बोर्डाचे पेपर तपासण्यास नकार देत पेपरचा गठ्ठा मुख्याध्यापकाच्या सुपूर्द केला आहे. हा प्रकार लाखांदूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात घडला. प्रमोद जांभुळकर असे पेपर परत करणाऱ्या घड्याळी तासिका शिक्षकाचे नाव आहे.

सविस्तर असे, नुकत्याच इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा आटोपल्या आहेत. परीक्षा आटोपताच बोर्डाचे पेपर तपासणीसाठी नियमित शिक्षकांसह घड्याळी तासिका शिक्षकांना पेपरचे गठ्ठे पाठविण्यात आले. भंडारा जिल्ह्यातील शिक्षण विभागानेच शैक्षणिक सत्र संपण्यापूर्वीच घड्याळी तासिका शिक्षकांचे सेवा समाप्ती केल्याने संतापलेल्या घड्याळी तासिका शिक्षकाने बोर्डाचे पेपर तपासण्यास नकार देत पेपरचा गठ्ठा मुख्याध्यापकाच्या सुपूर्द केला आहे.

Web Title: Refusal to check answer sheet of clockwork teacher in bhandara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.