प्रादेशिक पाणीपुरवठा योजना इतिहासजमा
By admin | Published: November 17, 2015 12:41 AM2015-11-17T00:41:52+5:302015-11-17T00:41:52+5:30
बपेरा गावाच्या हद्दीत बांधकाम करण्यात आलेली सुकळी (नकुल) प्रादेशिक पाणी पुरवठा योजना इतिहास जमा होणार असल्याचे दिसून येत आहे.
योजना भंगारात : गावात अभिनव जलकुंभ, शासनाची निष्क्रियता कारणीभूत
रंजित चिंचखेडे चुल्हाड(सिहोरा)
बपेरा गावाच्या हद्दीत बांधकाम करण्यात आलेली सुकळी (नकुल) प्रादेशिक पाणी पुरवठा योजना इतिहास जमा होणार असल्याचे दिसून येत आहे. कोट्यवधी रुपये खर्चूनही बपेरा जिल्हा परिषद क्षेत्रातील नागरिकांना शुध्द पाणी मिळाले नाही. ही शोकांतिका आहे.
वैनगंगा व बावनथडी या बारमाही वाहणाऱ्या नद्याच्या खोऱ्यात बपेरा जिल्हा परिषद क्षेत्रातील गावे आहेत. पंरतु नियोजन शुन्यतेमुळे या गावात भर उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करण्याचे संकट गावकऱ्यांवर येत आहे. या गावात नळ योजना असून गावकऱ्यांची तहान भागवित असले तरी शुध्द पाणी पुरवठ्याची 'नो गॅरंटी' आहे. या नळ योजनांनी जलशुध्दीकरणाची सोय नाही. नदीपात्रातून उपसा करण्यात येणारे पाणी थेट नागरिकांना दिले जात आहे. जलकुंभात केवळ ब्लिचींग पावडरचा आधार आहे. दरम्यान या गावांना शुध्द पाणी पुरवठा करण्यासाठी बपेरा गावाच्या हद्दीत सुकळी (नकुल) प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम करण्यात आले आहे. या योजनेचे गावा-गावात अभिनव जलकुंभ उभ्या करण्यात आलेल्या आहेत.
या योजनेने सुरुवातीपासुन कटुसत्य अनुभवले आहे. योजनेच्या विकासामुळे सातत्याने लोकप्रतिनिधीचेही दुर्लक्ष झाले आहे. या जिल्हा परिषद क्षेत्रातुन खासदार झाले. या शिवाय जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद मिळाले आहे. पंरतु या पदाचा उपयोग तहान भागविण्यासाठी झाला नाही. या परिसरात येरली आणि सिहोरा अशा दोन प्रादेशिक पाणी पुरवठा योजना निरंतर सुरु आहेत. पंरतु प्रशासनाला सुकळी (नकुल) प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला न्याय देता आले नाही.
सध्या या योजेनत लोखंडी साहित्य लंपास झाली आहेत. विजेची उपकरणे चोरीला गेली आहेत. अनेक साहित्यांना गंज चढलेला आहे. केवळ योजनेचा सांगाडा शिल्लक आहे. पुन्हा या योजनेची पुर्नबांधणी करतांना लाखो रुपयाची गरज पडणार आहे. विजेचे देयके थकल्याने विज वितरण कंपनी कान टवकारुन आहे. विज पुरवठा आधीच खंडीत करण्यात आला आहे. या योजनेची सुरक्षा वाऱ्यावर सोडण्यात आली आहे. सुरक्षा करणे करिता योजनेत आता काही शिल्लक नाही. पाण्याला ग्रामीण भागात पुण्य समजले जात असताना यंत्रणा किती गंभीर आहे. त्याचे हे ताजे उदाहरण आहे. हक्काचे पाणी पुरवठा योजना नियोजनाअभावी लंगडी झाली आहे. या योजनेची अभिनव टाकी देवरी (देव) गावात आहे. या टाकीचे एक बुंद पाणी अनुभवला नाही. गावात टाकी असल्याने अन्य योजना मंजुर करताना डोकदुखी होत आहे.
जिल्हा परिषद सदस्य प्रेरणा तुरकर यांचे गृहगाव आहे. त्यांचे नळ योजना मंजुरीसाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहे. या जिल्हा परिषद क्षेत्रात तिन महिला नेतृत्व करीत आहेत. या शिवाय बहुतांश गावात महिला सरपंच आहेत. पाण्याची असणारी झळ त्यांनी अनुभवली आहे. त्यामुळे त्यांनी ग्रामसभेत योजना पुर्ववत सुरु ठेवण्यासाठी ठराव घेण्याचे पाऊल उचलले आहे. या योजनेसाठी राजकीय इच्छेसह पुढाकाराची गरज निर्माण झाली आहे.