प्रादेशिक पाणीपुरवठा योजना जाणार पडद्याआड ! जलकुंभावर जल जीवन मिशनचा ताबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 15:26 IST2025-04-12T15:26:17+5:302025-04-12T15:26:48+5:30
केला फक्त तगरंगोटीवर खर्च : २ लाख ६५ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला.

Regional water supply scheme to go behind the scenes! Jal Jeevan Mission takes over Jal Kumbhavar
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : नागरिकांना जलशुद्धीकरण आणि प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून शुद्ध पाणी उपलब्ध करण्यासाठी सुकळी नकुल प्रादेशिक पाणी पुरवठा बपेरा गावाचे हद्दीत तयार करण्यात आली. योजनेची जलवाहिनी जिल्हा परिषद क्षेत्रातील प्रत्येक गावात देण्यात आली. या योजनेचे अभिनव जलकुंभ निर्माण करण्यात आली. गुंडभर पाणी योजनेने नागरिकांना दिले नसताना योजनाच गुंडाळण्यात आली आहे. या योजनेच्या जलकुंभावर जल जीवन मिशनने ताबा घेतला आहे. प्रादेशिक पाणी पुरवठा योजना पडद्याआड गेल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे.
बपेरा जिल्हा परिषद क्षेत्रातील गावांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी सुकळी नकुल प्रादेशिक पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. योजनेला जागा मिळाली नसल्याने बपेरा गावाचे हद्दीत ही योजना साकारण्यात आली आहे. योजनेला जलशुद्धीकरण केंद्र असल्याने जिल्हा परिषद क्षेत्रातील देवरी देव, सुकळी नकुल, बपेरा, देवसर्रा, बिनाखी, गोंडीटोला, ब्राह्मणटोला, महालगाव, वारपीडकेपार, सोंड्या, गावात जलवाहिनी घालण्यात आली.
या योजनेचे गावात अभिनव जलकुंभ तयार करण्यात आले. जलवाहिनी आणि जलकुंभ बांधकामावर कोट्यवधी खर्च करण्यात आले. बावनथडी नदीवर पंपगृह देण्यात आले. योजनेपासून गावांचे आंतर १२ किमी अंतरावर असल्याने विलंब पाणीपुरवठा करण्याची अपेक्षा गावकऱ्यांना होती. परंतु झाले उलटेच कोट्यवधी खर्चुनही योजनेचे पाणी गावात पोहचले नाही.
पुन्हा गावकऱ्यांना मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशन हर घर नल योजना गावात मंजूर करण्यात आली. परंतु या योजनेने नागरिकांचा विश्वास संपादन केला. नसल्याने सर्वेक्षण करताना गावात विरोध होऊ लागला आहे. गावातील नळ योजनाच बरी, असे ठणकावून सांगितले आहे. परिसरात बहुतांश गावात जल जीवन मिशन हर घर नल योजना देण्यात आली आहे. गेल्या वर्षभरापासून एक थेंब पाणी नागरिकांचे दारात पोहचले नाही. जल जीवन मिशन हर घर नल योजनेच्या प्रस्तावित कामाची विभागीय चौकशी करण्याची ओरड सुरू झाली आहे.
२ लाख ६५ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला.
बिनाखी गावात प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा जलकुंभ तयार करण्यात आलेला आहे. या जलकुंभात ग्रामीण नळ योजनेची जलवाहिनी जोडण्यात आली आहे. जलकुंभाच्या दुरुस्तीवर २ लाख ६५ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आल्याचे फलकात नमूद करण्यात आले आहे.
तरीही गावकरी तहानलेलेच !
नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, ग्रामीण पाणी पुरवठा योजना, जल जीवन मिशन हर घर नल योजना अशा योजना राबविण्यात आलेल्या आहेत. परंतु योजना नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा करू शकल्या नाहीत, विशेषतः जल जीवन मिशन हर घर नल योजना वादग्रस्त ठरली आहे.