बाहेरुन आलेल्या २१५४ व्यक्तींची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 06:00 AM2020-03-26T06:00:00+5:302020-03-26T06:00:40+5:30

भंडारा जिल्ह्यातून अनेकजण पुणे-मुंबई यासह इतर महानगरात नोकरी आणि कामाच्या निमित्ताने गेले होते. ती मंडळी आता गावाकडे परतू लागली आहे. कोरोना संसर्गामुळे गावकऱ्यांत अशा व्यक्तींबद्दल गैरसमज निर्माण होत आहे. त्यामुळे अशा व्यक्तींचा शोध आशा वर्कर, तलाठी, पोलीस पाटील, ग्रामसेवकांच्या मदतीने घेतला जात आहे. त्यांची आरोग्य केंद्रात तपासणी करून हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला जात आहे.

Registration of 2154 persons from outside | बाहेरुन आलेल्या २१५४ व्यक्तींची नोंदणी

बाहेरुन आलेल्या २१५४ व्यक्तींची नोंदणी

Next
ठळक मुद्देएम.जे. प्रदीपचंद्रन : सर्व व्यक्ती गृह विलगीकरण कक्षात, महानगर आणि विदेशातून येणाऱ्यांवर करडी नजर

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महानगरातून जिल्ह्यात आतापर्यंत २१५४ व्यक्ती दाखल झाल्या असून त्या सर्वांची नोंदणी करण्यात आली आहे. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील आणि ग्रामसेवकांकडून दररोज महानगरातून येणाऱ्यांची माहिती घेतली जात आहे. या सर्वांचे गृह विलगीकरण करण्यात आले असून दररोज तपासणी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी येथे पत्रपरिषदेत दिली.
भंडारा जिल्ह्यातून अनेकजण पुणे-मुंबई यासह इतर महानगरात नोकरी आणि कामाच्या निमित्ताने गेले होते. ती मंडळी आता गावाकडे परतू लागली आहे. कोरोना संसर्गामुळे गावकऱ्यांत अशा व्यक्तींबद्दल गैरसमज निर्माण होत आहे. त्यामुळे अशा व्यक्तींचा शोध आशा वर्कर, तलाठी, पोलीस पाटील, ग्रामसेवकांच्या मदतीने घेतला जात आहे. त्यांची आरोग्य केंद्रात तपासणी करून हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला जात आहे. भंडारा जिल्ह्यात २१५४ लोकांची नोंदणी करण्यात आली असून या सर्वांना घरीच राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आता सर्व जिल्ह्यांच्या सीमा सील झाल्याने महानगरातून येणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. परंतु महानगरातून दाखल झालेल्या प्रत्येक व्यक्तीवर प्रशासनाची करडी नजर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आपातकालीन स्थितीसाठी प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. गरज भासल्या सर्व वसतिगृह रुग्णांसाठी ताब्यात घेतली जातील. तसेच खासगी डॉक्टरांची सेवाही अधिग्रहीत केली जाईल. सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करण्याचा विचार झाला होता. परंतु ६० वर्षावरील ही मंडळी असल्याने सध्या त्यांना रुग्णांच्या उपचारासाठी बोलावले जाणार नसल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी नागरिकांनी घराबाहेर न निघता पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. विनाकारण घराबाहेर निघणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

भटक्यांचे सर्वेक्षण
भंडारा शहरात विविध व्यवसायाच्या निमित्ताने आलेले भटके व्यक्ती, निराधार व्यक्ती, भिकारी अशांचे लवकरच तहसीलदारांच्या माध्यमातून सर्वेक्षण केले जाईल. शहरातील अशा व्यक्तींना वाऱ्यावर सोडून देऊ शकत नाही. या सर्वांची व्यवस्था एखाद्या वसतिगृहात करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.

मॉक ड्रिलला घाबरू नका
जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा तत्पर आहे की नाही याची मॉक ड्रील द्वारे तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी तेथे जनरेटरचा वायर निघाल्याचे दिसून आले. तसेच ऑक्सीजनही लिक असल्याचे पुढे आले. आरोग्य सुविधेतील त्रृट्या दूर करण्यासाठी मॉक ड्रील घेण्यात आला. आता लवकरच मॉक ड्रील घेतला जाणार असून कोरोनाचा रुग्ण आल्यावर आरोग्य यंत्रणा कशा पद्धतीने हाताळते याची चाचपणी केली जाणार आहे. त्यासाठी शहरातून अ‍ॅम्बुलन्स आणि इतर वाहने धावतील. रुग्णालयात डॉक्टर विशिष्ट कीट सह सुसज्ज राहतील. हा प्रकार केवळ आरोग्य यंत्रणेची तपासणी करण्यासाठी आहे. नागरिकांनी अशी मॉक ड्रील झाल्यास अफवा पसरवू नये आणि घाबरून जाऊ नये असे जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी सांगितले.

जीवनावश्यक वस्तू सुरळीत
भंडारा जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंचा साठा योग्य प्रमाणात असून त्याचे वितरणही सुरळीतपणे सुरु आहे. नागरिकांनी किराणा दुकानातून व इतर ठिकाणाहून साहित्य खरेदी करताना गर्दी करू नये. विशिष्ट अंतर ठेवूनच खरेदी करावी. आवश्यकतेपेक्षा जास्त वस्तू खरेदी करून साठा करू नये. असे आवाहन जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी केले.

Web Title: Registration of 2154 persons from outside

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.