धान खरेदी केंद्रावर १८ हजाराहून अधिक शेतकऱ्यांची नोंदणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 04:56 PM2023-05-25T16:56:32+5:302023-05-25T16:57:53+5:30
ऑनलाईन नोंदणीची मुदत ३१ मे पर्यंत : भंडारा जिल्ह्यात १८८ धान खरेदी केंद्र सुरू
देवानंद नंदेश्वर
भंडारा : आधारभूत किंमत धान खरेदी योजना रब्बी हंगाममध्ये शासनाने शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी ३१ मे पर्यत मुदतवाढ दिली आहे. जिल्ह्यात १८८ धान खरेदी केंद्र सुरू असून १८ हजार ४२० शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे.
भंडारा तालुक्यातील १९ धान खरेदी केंद्रामध्ये २ हजार ७२ शेतकऱ्यांची, मोहाडी तालुक्यातील २४ धान खरेदी केंद्रामध्ये ३८९ शेतकऱ्यांची, तुमसर तालुक्यातील ३० धान खरेदी केंद्रामध्ये १ हजार ४०२ शेतकऱ्यांची, लाखनी तालुक्यातील २२ धान खरेदी केंद्रामध्ये ५ हजार ८०४ शेतकऱ्यांची, साकोली तालुक्यातील २७ धान खरेदी केंद्रामध्ये ६ हजार ३६३ शेतकऱ्यांची, लाखांदूर तालुक्यातील २९ खरेदी केंद्रामध्ये ७२८ शेतकऱ्यांची, पवनी तालुक्यातील ३७ केंद्रामध्ये १ हजार ६५४ शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी झाली आहे. महानोंदणी ॲप व ईतर खरेदी केंद्रावर आठ शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी झाली आहे.
शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी झालेली नाही, अशा सर्व शेतकऱ्यांना आधारभूत किंमत धान खरेदी योजनेचा लाभ मिळण्यासाठी आपल्या नावाची नोंदणी करणे आवश्यक आहे. खरेदी केंद्रावर नोंदणीसाठी जातांना शेतकऱ्यांनी सातबारा उतारा, आधार कार्ड व बॅंक पासबुकची झेरॉक्स या कागदपत्रासह नोंदणी केंद्रावर जावून आपली नोंदणी करावी. तसेच ज्या सबएजंट संस्थांचे आय. डी. सुरू आहेत, त्या संस्थांनी धान खरेदी सुरू करावी.
- एस.एस पाटील, जिल्हा पणन अधिकारी, भंडारा