रेलयात्री समितीची विभागीय प्रबंधकांशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 10:51 PM2018-07-06T22:51:27+5:302018-07-06T22:51:57+5:30
भंडारा रोड रेल्वे स्टेशनवर पुणे -बिलासपूर थांब्यांसहित काही जलदगती गाड्यांचे थांबे मिळावेत तसेच भंडारा शहर रेल्वे स्टेशन स्थापन करण्यात यावे. या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी व भंडारा रोड रेल्वे स्थानकावर प्रवासी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. या मागणीसाठी भंडारा रेल यात्री समितीच्या पदाधिकाठयांनी नागपूर येथे दक्षिण - पूर्व मध्य रेल्वेच्या प्रबंधक शोभना बंडोपाध्याय यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले व त्यांच्याशी चर्चा केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा रोड रेल्वे स्टेशनवर पुणे -बिलासपूर थांब्यांसहित काही जलदगती गाड्यांचे थांबे मिळावेत तसेच भंडारा शहर रेल्वे स्टेशन स्थापन करण्यात यावे. या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी व भंडारा रोड रेल्वे स्थानकावर प्रवासी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. या मागणीसाठी भंडारा रेल यात्री समितीच्या पदाधिकाठयांनी नागपूर येथे दक्षिण - पूर्व मध्य रेल्वेच्या प्रबंधक शोभना बंडोपाध्याय यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले व त्यांच्याशी चर्चा केली.
चर्चेत संस्थेचे सचिव रमेश सुपारे यांनी भंडारा रोड रेल्वे स्टेशनच्या स्थापनेसाठी २०१४ पासून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती देत जिल्ह्यातील सात तालुके व २० लक्ष लोकसंख्येसाठी असलेल्या भंडारा रोड रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी १२ किलोमीटरचा त्रासदायक प्रवास करावा लागत असल्याने भंडारा शहर रेल्वे स्टेशनची आवश्यकता व उपयुक्तता पटवून सांगितली. पुणे येथे शैक्षणिक हब असल्याने विद्यार्थी व पालकांचा सदैव संपर्क असावा यासाठी वरियलदास खानवानी यांनी बिलासपूर- पुणे ट्रेनचा थांब्याची मागणी केली. सुरेश फुलसुंगे यांनी भंडारा जिल्ह्याचे ठिकाण असून २६ जलदगती गाड्यांचे थांब्याची मागणी उचलून धरली. सेवक कारेमोरे यांनी भंडारा येथील रेल्वेचे पार्सल आॅफिस सुरू करावे. रेल्वे पोलीस स्टेशनसाठी जागा उपलब्ध करावी. तसेच रॅक पाईन्टची व्यवस्था करण्याची मागणी केली.
भंडारा रोड रेल्वे स्थानकावर अपंग प्रवाशांना होत असलेला त्रास गाड्यांना होणारा विलंब व महिला प्रवाश्यांच्या दृष्टीने महिला टी.टी. व महिला पोलीसची आवश्यकता तसेच गितांजली रेल्वेमध्ये बसतांना आरक्षित प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबद्दल सांगण्यात आले.
खंडेरा यांनी रेल्वे स्थानकाच्या भिंती वनचित्रांनी शुभोभित करण्यात याव्यात. सोबतच हटिया ट्रेन आऊटवर नेहमीच थांबत असल्याने तिचा स्टेशनवर थांबा देण्यात आल्यास प्रवाशांना सोय होईल असे सांगितले. प्रवाश्यांच्या सोईच्या दृष्टीने अनेक मुद्यांवर यावेळी चर्चा झाली. नागपूर क्षेत्र रेल्वे प्रबंधक बंडोपाध्याय यांनी प्रतिनिधी मंडळाच्या मागण्या व म्हणणे संयमपूर्वक ऐकल्यावर अनेक मुद्यांवर समितीच्या म्हणण्याशी सहमती दर्शविली. उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले, तर गाड्यांचे थांबे रेल्वे स्टेशनचा प्रश्न, रॅक पाईन्ट आदी धोरणात्मक मुद्यांवर वरिष्ठांकडे आपल्या शिफारशींसह निवेदन पाठविण्याचे आश्वासन दिले. सदर शिष्टमंडळात समितीचे अध्यक्ष प्रेमराज मोहोकर यांच्यासह रमेश सुपारे, सेवक कारेमोरे, डि.एफ. कोचे , विजय खंडेरा, सुरेश पुष्ठलसुंगे ,वरियलदास खानवानी, ललीत बाच्छिल आदींचा समावेश होता.