कत्तलखान्यात जाणाºया ९० बैलांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 11:58 PM2017-09-29T23:58:47+5:302017-09-29T23:58:58+5:30

मोहाडी तालुक्यातील शिवनी काटीच्या जंगलातून ९० बैलांना कामठी येथील कत्तलखान्यात नेत असल्याची गोपनीय माहिती आंधळगाव पोलिसांना लागताच पोलीस निरीक्षक ए.एम. गुरनुले यांनी ताफ्यासह पाठलाग करुन ९० बैलांची सुटका केली.

 Release of 90 bullocks in slaughter house | कत्तलखान्यात जाणाºया ९० बैलांची सुटका

कत्तलखान्यात जाणाºया ९० बैलांची सुटका

Next
ठळक मुद्देपाच जणांना अटक : आंधळगाव पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
आंधळगाव : मोहाडी तालुक्यातील शिवनी काटीच्या जंगलातून ९० बैलांना कामठी येथील कत्तलखान्यात नेत असल्याची गोपनीय माहिती आंधळगाव पोलिसांना लागताच पोलीस निरीक्षक ए.एम. गुरनुले यांनी ताफ्यासह पाठलाग करुन ९० बैलांची सुटका केली. त्यानंतर या बैलांना पिंपळगाव व रेंगेपार येथील गोशाळेत रवाना करण्यात आले.
गुरूवारच्या पहाटे शिवनी जंगलातून उमेश नागोसे व भाऊराव देव्हारे व इतर तीन जण रा.शिवनी हे ट्रक क्र. (एमएच २० डी ७६१७) ट्रक क्र. (टी एस ०१ व्ही.ए. ७४११) या दोन ट्रकमधून बैलांना वाहून नेत असल्याचे आढळून आले. तपासणीअंती हे बैल कामठी येथील कत्तलखान्यात नेत असल्याची माहिती मिळाली. या ट्रकांना पकडून आंधळगाव पोलीस ठाण्यात आणून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या ट्रकमध्ये ९० बैल आढळून आली. त्यांची किंमत २ लाख ७० हजार नमूद करण्यात आली आहे. दोन ट्रकची किंमत २० लाख रुपये पकडून असा २२ लाख ७० हजार रूपयांचा साहित्य जप्त करण्यात आला याप्रकरणी सर्व आरोपींवर ११०/१७, ११(१) प्राणी कायदा १९६० अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. कारवाई ठाणेदार ए.एम. गुरनुले, रविंद्र म्हैसकर, पोलीश शिपाई लोकेश शिंगाडे, राऊत, भगत वैरागडे, काळे, बाभरे, भोंडे हे करीत आहेत.

Web Title:  Release of 90 bullocks in slaughter house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.