पालिका निवडणुकीची अधिसूचना जारी

By admin | Published: November 16, 2016 12:48 AM2016-11-16T00:48:24+5:302016-11-16T00:48:24+5:30

जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, पवनी व साकोली नगर परिषद सदस्य आणि थेट नगराध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केला असून...

Release of municipal elections | पालिका निवडणुकीची अधिसूचना जारी

पालिका निवडणुकीची अधिसूचना जारी

Next

पालिकेसाठी आचारसंहिता लागू : १९ पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार
भंडारा : जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, पवनी व साकोली नगर परिषद सदस्य आणि थेट नगराध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केला असून या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी नगर परिषद निहाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. भंडारा-गोदिया विधान परिषदेची निवडणूक असल्यामुळे यापूर्वीच अधिसूचना जारी झाली असली तरी नगर पालिका क्षेत्रासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.
भंडारा नगर परिषद निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी डॉ.संपत खिलारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी अनिल अढागळे यांची, तुमसर नगर परिषद निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसिलदार डी.टी. सोनवणे यांची, पवनी नगर परिषद निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी जी.जी. जोशी यांची तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नायब तहसिलदार महेंद्र वाकलेकर यांची तर साकोली नगर परिषद निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एच.डब्ल्यु. खडतकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
थेट जनतेतून नगराध्यक्ष आणि नगर परिषद सदस्यपदासाठी नामनिर्देशनपत्र देणे व स्वीकारणे १९ ते २५ नोव्हेंबर या दरम्यान राहणार आहे. नामनिर्देशन पत्र सादर करण्याची शेवटची तारीख २५ नोव्हेंबर असून सकाळी ११ ते दुपारी ३ अशी आहे. नामनिर्देशन पत्र छाननी २८ नोव्हेंबर रोजी असून अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ७ डिसेंबर आहे. ८ डिसेंबर रोजी निवडणूक चिन्ह वाटप व निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द करण्यात येईल. १८ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते ५.३० पर्यंत मतदान होणार असून १९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजतापासून मतमोजणी होणार आहे.
या नगर परिषद निवडणुकांसाठी मुख्य निवडणूक निरिक्षक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. अहिरे यांची तर निवडणूक निरिक्षक म्हणून अप्पर जिल्हाधिकारी प्रदीप डांगे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

नगरसेवक भ्रमंतीवर
नगर परिषद निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वीपासून जिल्ह्यातील भंडारा, तुमसर व पवनी येथील नगरसेवकांचा गावात राबता होता. त्यानंतर १८ डिसेंबर ही निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यासाठी ईच्छूकांच्या शहरभर भेटीगाठी सुरू झाल्या होत्या. परंतु या निवडणुकीपूर्वी १९ नोव्हेंबरला विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यामुळे आणि या निवडणुकीसाठी नगरसेवक मतदार असल्यामुळे आपला मतदार सुरक्षित राहावा, यासाठी त्या-त्या पक्षाने मतदारांना सुरक्षितस्थळी नेले आहे. दरम्यान नगर परिषद निवडणुकीची अधिसूचना आज मंगळवारला जारी झाल्यानंतर एकही नगरसेवक शहरात नसल्याचे चित्र पहिल्यांदाच दिसून येत आहे.

येथे होईल मतमोजणी
भंडारा येथील मतमोजणी पोलीस बहुउद्देशिय सभागृह भंडारा, तुमसर येथील मतमोजणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तुमसर, पवनी येथील मतमोजणी नगर पालिका विद्यालय नवीन इमारत पवनी तर साकोली येथील मतमोजणी शासकीय तंत्रनिकेतन सेंदुरवाफा साकोली याठिकाणी होणार आहे.

Web Title: Release of municipal elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.