आरसेटीच्या नवीन ईमारतीचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 11:08 PM2018-02-06T23:08:15+5:302018-02-06T23:08:34+5:30
स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ.परिणय फुके, आ.रामचंद्र अवसरे, आ.चरण वाघमारे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी, जिल्हा पोलिस अधीक्षक विनिता साहू, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर, बँक आॅफ इंडियाचे महाप्रबंधक अजय शाहू, के.एन. जनार्दना, आंचलिक प्रबंधक जे.सी. शशीराज, झोनल मॅनेजर ए.के. जमुआर, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आर.एस.खांडेकर, व्ही.एम.पोतदार, संचालक एन.वाय. सोनकुसरे, इरफान खान पठाण,जयप्रकाश शर्मा, आर.आर.बैस, सुधीर श्रीवास्तव, पी.एच.गुप्ता उपस्थित होते.
लाल बहादूर शास्त्री विद्यालयाच्या प्रागंणात १.२४ कोटी रूपये खर्च करून ही वास्तू उभारण्यात आली आहे. याठिकाणी तरूण-तरूणींना स्वयंरोजगाराचे निवासी प्रशिक्षण देण्याची सुविधा आहे. यापूर्वी हे प्रशिक्षण केंद्र माविम कार्यालय मोहाडी येथे होते.
मागील तीन वर्षात आरसेटी मार्फत ३४११ उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यापैकी २,२०९ उमेदवारांनी आपला रोजगार सुरु केला आहे. यापुढे नुतन इमारतीत प्रशिक्षण सोय असणार आहे. महिला बचतगटांनी बनविलेल्या उत्पादन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट देण्यात आली. महिला बचतगटांच्या महिलांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रतिनिधीक सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशिक्षणार्थी तरूण आणि तरूणी व महिला बचतगटांच्या महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.