बघेडा व कारली जलाशयाचे पाणी सोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 01:15 AM2019-07-21T01:15:59+5:302019-07-21T01:16:30+5:30
यावर्षीच्या खरीप हंगामात अनेक दिवसांपासून वरूणराजाने दडी मारल्यामुळे धान नर्सरी (खारी) करपण्याच्या मार्गावर असल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. धान नर्सरी वाचवण्यासाठी बघेडा व कारली जलाशयाचे पाणी सोडण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनारा : यावर्षीच्या खरीप हंगामात अनेक दिवसांपासून वरूणराजाने दडी मारल्यामुळे धान नर्सरी (खारी) करपण्याच्या मार्गावर असल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. धान नर्सरी वाचवण्यासाठी बघेडा व कारली जलाशयाचे पाणी सोडण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
तुमसर तालुक्यातील बघेडा व कारली जलाशयांतर्गत शेकडो हेक्टरमध्ये धान रोवणी करिता शेतकऱ्यांनी महागडी धानबीजाई विकत आणून धान नर्सरी तयार केली. परंतु वरूणराजाने अनेक दिवसांपासून पाठ फिरवल्याने शेतकºयांच्या धान नर्सरी करपण्याच्या मार्गावर असल्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे. परीसरातील शेतजमीन निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. बोटावर मोजेल एवढेच शेतकरी कृषीपंप धारक आहेत. परंतु विहीरीत पाणी नाही तर तेही शेतकरी पाणी आणणार कुठून, असा प्रश्न आहे. पावसाळ्याचा सव्वा महिला लोटला तरी विहिरीची पातळी वाढली नाही. नाले ओस पडले आहेत. अनेकांची तूर, भाजीपालाव इतर पीक संकटात सापडले आहेत. कर्जबाजारी शेतकºयांचा अवाढव्य खर्च झालेला असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.
दुबार पेरणीचे संकट
पवनारा येथील शेतकºयांची धान नर्सरी पुर्णत: करपलेली दिसत आहे. बघेडा जलाशयात जवळपास २.२५ मिटर, तर कारली जलाशयात १.५० मिटर पाणी आहे. त्यामुळे बघेडा, पवनारा, कारली, आसलपाणी येथील शेतकºयांच्या धान नर्सरीला जीवनदान मिळू शकते. संबधित विभागाने तातडीने बघेडा व कारली जलाशयाचे पाणी पिकांसाठी सोडण्यास मरणासन्न अवस्थेत असलेल्या पिकांना जीवदान मिळू शकते.
केवीलवाणा प्रयत्न
पावसाने दडी मारल्याने पीक करपण्याच्या मार्गावर आहे. डोळ्यासमोर कर्जबाजारी होत असल्याचे दिसत असल्याने अनेक शेतकरी पीक वाचविण्यासाठी वाट्टेल ती उपाययोजना करून केविलवणा प्रयत्न करीत आहेत. धान नर्सरीला दूरवरुन बैलगाडीने तसेच बादल्यांमध्ये पाणी आणून पाणी दिले जात आहे.