धानपिकासाठी पेंच प्रकल्पाचे पाणी सोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 11:54 PM2017-09-27T23:54:56+5:302017-09-27T23:55:06+5:30
धानपिकाला पाण्याची नितांत गरज असून, पेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्यात यावे अशी मागणी भंडारा विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : धानपिकाला पाण्याची नितांत गरज असून, पेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्यात यावे अशी मागणी भंडारा विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली आहे.
जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असून पावसाच्या लहरीपणामुळे सुरुवातीपासूनच रोवणीला विलंब झाला. अपुºया व अवेळी आलेल्या पावसामुळे सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत रोवणी सुरू होती, सध्यास्थितीत धानपिकाला पाण्याची अतिशय गरज असली तरी मागील काही दिवसापासून पाऊस पडला नसल्याने धानपिक वाळण्याच्या अवस्थेत आहे. जिल्ह्यातील अनेक सिंचन प्रकल्प अपूर्णावस्थेत असल्याने त्या प्रकल्पाचे पाणी शेतीला मिळत नाही.
नागपूर जिल्ह्यातील पेंच प्रकल्पाचे पाणी भंडारा व मोहाडी या दोन तालुक्यात येते. भंडारा तालुक्यातील शहापूर, खरबी, ठाणा, खात, वरठी, खोकरला, टवेपार, भोजापूर, गोपीवाडा खरबी, बेला, अशा ३७ गावातील शेतीला पेंच प्रकल्पाचे पाणी दिले जाते. परंतु धानपिकाला पाण्याची गरज असतांनाही पेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्यात आले नाही. पेंच विभाग नागपूरकडे मागणी करूनही दुर्लक्ष केले जात आहे.
पेंच पाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यात असलेले कार्यालय बंद करून नागपूर जिल्ह्यात स्थानांतरित करण्यात आले, त्यामुळे शेतकºयांची अडचण झाली आहे. याकडे भंडारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असून शेतकºयांच्या समस्यांप्रती ते उदासीन असल्याचा आरोप नरेंद्र भोंडेकर यांनी केला आहे.
निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकलेला शेतकरी कर्जबाजारी होत असून नापिकीमुळे शेतकºयांच्या आत्महत्या वाढत आहे. त्यातच पाटबंधारे विभाग शेतकºयांना अडचणीत आणत आहे. अशास्थितीत शतकºयांचे हित लक्षात घेऊन धान पिकाला जीवनदान देण्यासाठी पेंच प्रकल्प अधिकाºयांनी पेंच प्रकल्पाचे पाणी सोडावे, अशी मागणी माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली आहे.
पेंच प्रकल्पाचे पाणी लवकरात लवकर सोडले नाही तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही यावेळी नरेंद्र भोंडेकर यांनी पेंच प्रकल्प प्रशासन व जिल्हा प्रशासनाला दिला आहे .