पालांदूर येथील शेळी बाजार स्मशानभूमीच्या जागेत स्थलांतरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:06 AM2021-02-21T05:06:39+5:302021-02-21T05:06:39+5:30

पालांदूर : जागेच्या अभावाने पालांदूर येथील शेळी बाजार नव्याने स्मशानभूमीच्या मोकळ्या जागेत हलविण्यात आला. पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांचे व्यापारी ...

Relocated to Goat Market Cemetery at Palandur | पालांदूर येथील शेळी बाजार स्मशानभूमीच्या जागेत स्थलांतरित

पालांदूर येथील शेळी बाजार स्मशानभूमीच्या जागेत स्थलांतरित

Next

पालांदूर : जागेच्या अभावाने पालांदूर येथील शेळी बाजार नव्याने स्मशानभूमीच्या मोकळ्या जागेत हलविण्यात आला. पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांचे व्यापारी इथे हिरिरीने सहभाग नोंदवतात. दिवसेंदिवस शेळी बाजार वाढत असल्याने प्रशस्त जागेत व्यापारी व शेतकरी यांनी नव्या जागेला प्राधान्य दिलेले आहे.

लाखनी तालुक्यातील पालांदूर येथील शनिवारी भरणारा आठवडी बाजार खूप मोठ्या स्वरुपाचा आहे. बाजाराचा व्याप वाढत असल्याने व अतिक्रमण झाल्याने बाजाराची जागा व्यापाऱ्यांना कमी पडत आहे. त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला आग्रह करीत शेळी बाजार मोकळ्या जागेत स्थलांतरित करण्याची मागणी केली होती. कृषी उत्पन्न बाजार समितीने ग्रामपंचायतला विचारत स्मशानभूमीच्या पुढील मोकळ्या जागेत सपाटीकरण करून बाजार स्थलांतरित केला. खूप मोठी मोकळी जागा असल्याने वाहनांच्या रहदारीसाठी व बकऱ्यांच्या खरेदी-विक्रीसाठी जागा मुबलक व सोयीची असल्याचे प्राथमिक अभ्यासात व्यापारी व शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नियोजित बाजार चौकातला बाजार हा मुख्य रस्त्यावर भरत असल्याने सगळ्यांनाच अडचणीचे जाणवत आहे. मात्र जागाच अपुरी असल्याने बाजार हलवायचा कुठे, हा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.

गत दहा वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार समिती स्वतंत्र जमीन खरेदीकरिता प्रयत्न करीत आहे. परंतु गावाशेजारची जमिनी महागडी असल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती नियोजन अजूनही पूर्ण झालेले नाही. शनिवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात वाहतूक खोळंबलेली असते. मात्र दिवसेंदिवस पशुपालन वाढल्याने शेतकऱ्यांच्या शेळ्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. प्रभू कुरेकर, महादेव पडोळे यांच्या पुढाकारातून हा बाजार पालांदूरच्या स्मशानभूमीत मोकळ्या जागेत स्थलांतरित करण्यात आला.

कोट

पालांदूरचा आठवडी बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यापाऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत आम्ही हा बाजार स्थलांतरित केलेला आहे. स्वतंत्र पिण्याच्या पाण्याचीसुद्धा व्यवस्था आम्ही करू. दर शनिवारी सुमारे आठ ते दहा हजार रुपयांचा महसूल गोळा होतो.

किशोर भैसारे,

कनिष्ठ लिपिक कृषी उत्पन्न बाजार समिती लाखनी.

भविष्याच्या दृष्टीने पालांदूर हे शेळी व्यवसायात मोठी बाजारपेठ आहे. येथे व्यापार मोठ्या स्वरूपात होत आहे. दूरदृष्टीचा विचार करता व्यापाऱ्यांना हा बाजार स्मशानभूमीच्या ठिकाणी चांगला वाटत आहे.

दिगंबर दुर्गेश कोंढा /कोसरा

Web Title: Relocated to Goat Market Cemetery at Palandur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.