मेहकर येथे पैनगंगेच्या काठावर खोदकामात सापडले पुरातन मंदीराचे अवशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 02:39 PM2021-05-27T14:39:53+5:302021-05-27T18:21:03+5:30

Mehkar News : पैनगंगेच्या काठावर खोदकामात पुरातन मंदीराचे अवशेष सापडले.

Remains of an ancient temple found in excavations on the banks of the Pangange at Mehkar | मेहकर येथे पैनगंगेच्या काठावर खोदकामात सापडले पुरातन मंदीराचे अवशेष

मेहकर येथे पैनगंगेच्या काठावर खोदकामात सापडले पुरातन मंदीराचे अवशेष

googlenewsNext

- ओमप्रकाश देवकर

मेहकरः काळ्या पाशानातील शारंगधर बालाजींच्या आशियाखंडातील सर्वात आकर्षक व उंच मुर्तीमुळे प्रसिद्ध असलेल्या मेहकर शहरालगत वाहनाऱ्या पैनगंगा नदी लगतच्या शेतात खोदकामा दरम्यान पुरातन हेमाडपंथी मंदिराचे अवशेष सापडले आहेत. दरम्यान या पुरातन अवशेषामुळे मेहकर शहराच्या आणखी जुना इतिहास उजागर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
ना. घ. देशपांडेंच्या शिळ कवितेसह दंतकथेसाठी मोठे खाद्य राहिलेल्या कंचनिच्या महालामुळे मेहकर शहर प्रसिद्ध आहे. अशा या मेहकर शहरालगत जानेफळ मार्गावर असलेल्या नदीच्या अनिकटाजवळील शेतात पुरातन मंदिराचे हे अवशेष सापडल्यामुळे त्याचे कुतुहल निर्माण झाले आहे. त्यामुळे येथे बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर येथे पोलिस बंदोस्त लावण्यात येऊन गर्दी हटविण्यात आली. दरम्यान या घटनेचे गांभिर्य पाहता तहसिलदार डॉ. संजय गरकळ यांनी पुरातत्व विभागास याची माहिती देत छायाचित्र पाठविले आहेत. त्यानंतर पुरातत्व विभागाच्या आदेशानंतर येथील खोदकाम बंद करण्यात आले आहे.

मेहकर लगतच्या फैजलापूर शिवारात पूर्वी पैनगंगा नदी वाहत असे. कालातंराने याच शिवारात या नदीने मार्ग बदलल्याने नदीचा प्रवाह काही अंतरावरुन दुसऱ्या मार्गाने गेलेला आहे. या जुन्या ठिकाणी मोठा नाला आहे. हा नाला अनिल इंगळे यांच्या फैजलापूर शिवारातील शेतालगत वाहतो. पाणी जाण्यासाठी या नाल्याचे खोदकाम सुरु असताना या नाल्यात गुरुवारी २० फुट खोदल्यानंतर एक नंदी, मुर्तीचे भग्न अवशेष व मंदीराचे दगड आढळून आले आहेत. पैनगंगा नदीला आलेल्या एखाद्या मोठ्या पुरात हे मंदीर गाळामध्ये दबले असावे असा कयास आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तहसिलाद संजय गरकल यांनी घटनास्थलाला भेट दिली. त्यांच्या समवेस नायब तहसिलदार अजय पिंपरकर, तलाठी गायकवाड उपस्थित होते.


--पुरातन शिवमंदीर असण्याची शक्यता--

या ठिकाणी पुरातन शिवमंदीर असण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहे. सोबतच काळाच्या अेाघात हे मदीर पडले असावे येथे विखूरलेल्या अवस्थेतील दगडावरून तथा मंदीराच्या खांबावरून दिसते. या पुरातन अवशेषामध्ये वास्तूच्या पायऱ्याही आढळून आल्या आहेत. शिवाय सापडलेल्या नंदी चे दोन्हीही शिंगे मोडलेल्या अवस्थेत आहेत. एक मूर्ती सापडलेली आहे ती सुध्दा भग्न अवस्थेत आहे.


--शारंगधर बालाजींची मुर्तीही सापडली होती--

मेहकर येथे सध्या उभारण्यात आलेल्या शारंगधर बालाजीची मुर्तीही पैनगंगा नदीच्या काठालगत जमीनीत लाकडाच्या भुशामध्ये सुरक्षीतरित्या ठेवलेली १८८८ दरम्यान आढळून आली होती. त्यानंतर या मुर्तीची प्रतिष्ठापणा स्थानिकांनी केली होती. त्याचा मोठा इतिहास आहे. त्यामुळे आता सापडलेले मंदीराचे अवशेषही मेहकर शहराच्या पुरातन इतिहासावर प्रकाश टाकणारे असू शकतात असा कयास व्यक्त केला जात आहेे.


--पुरातत्व विभाग सक्रीय--

मेहकमध्ये पुरातन मंदीराचे अवशेष सापडल्यानंतर पुरातत्व विभागही सक्रीय झाला आहे. सोमवारी नागपूर येथील पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक मेहकर येथे येऊन या अवशेषांची पाहणी करणार आहेत. त्यामुळे ते यासंदर्भात नेमके काय सांगतात याबाबत उत्सूकता लागून आहे.

Web Title: Remains of an ancient temple found in excavations on the banks of the Pangange at Mehkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.